IND vs NZ : सरफराज खानला या स्थानावर फलंदाजीला पाठवल्याने संताप, चाहत्यांनी काढला राग

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवशी भारताने चांगली कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात 263 धावा करत 28 धावांची आघाडी घेतली. तसेच दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत गेला आहे. असं असताना सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली आहे.

IND vs NZ : सरफराज खानला या स्थानावर फलंदाजीला पाठवल्याने संताप, चाहत्यांनी काढला राग
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 5:52 PM

भारत आणि न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीचा निकाल लागणार हे आता स्पष्ट झालं आहे. कारण दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावाचा खेळ जवळपास संपला आहे. त्यामुळे तीन दिवसात सामन्याचा निकाल लागणार हे निश्चित आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात भारताने 263 धावा केल्या. भारताला 28 धावांची आघाडी मिळाली आहे. असं असताना न्यूझीलंडचा दुसरा डाव गडगडला. तसं पाहिलं तर तिसऱ्या कसोटी भारताची मजबूत पकड आहे असं म्हणायला हरकत नाही. पण पहिल्या डावात भारताच्या बॅटिंग ऑर्डरवरून रणकंदन माजलं आहे. कारण मधल्या फळीतील सरफराज खानला थेट आठव्या स्थानावर फलंदाजीला उतरवलं गेलं. त्यामुळे क्रीडारसिकांचा चांगलाच संताप झाला. रवींद्र जडेजानंतर आठव्या स्थानावर फलंदाजीला उतरवलं. सरफराज खानला आपलं खातंही खोलता आलं नाही आणि शून्यावर बाद झाला. सरफराज खानला इतक्या खाली फलंदाजीला पाठवण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात नाईटवॉचमन म्हणून मोहम्मद सिराजला पाठवलं होतं. पण शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यातील 96 धावांची भागीदारीनंतर सरफराज खानला सातव्या स्थानावर पाठवलं जाईल अशी अपेक्षा होती. पण डावखुऱ्या फलंदाजाची जागा भरण्यासाठी रवींद्र जडेजाला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जेव्हा सरफराज खान मैदानात उतरला तेव्हा त्याला काही खास करता आलं नाही. फक्त 4 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. एजाज पटेलच्या गोलंदाजीवर टॉम ब्लंडेलला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. संजय मांजरेकरनेही प्रश्न उपस्थित केला आहे.

माजी क्रिकेटपटूने संजय मांजरेकरने सांगितलं की, ‘एक खेळाडू जो फॉर्मात आहे त्याने पहिल्या तीन कसोटीत तीन अर्धशतकं झळकावली आहेत. बंगळुरु कसोटीत 150 धावा केल्या. फिरकीपटूंविरोधात चांगला खेळतो. डाव उजवं कॉम्बिनेशन ठेवण्यासाठी त्याला खाली पाठवलं? याला काहीच अर्थ नाही. सरफराज खान आठव्या क्रमांकावर खेळत आहे. भारताचा चुकीचा निर्णय.’

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.