IND vs NZ : 24 वर्षानंतर भारतीय संघाने पाहिला नकोसा दिवस, न्यूझीलंडकडून 3-0 ने पराभव

न्यूझीलंडने भारतात येऊन भारताला क्लिन स्वीप दिला आहे. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघाची देशातच नाचक्की झाली आहे. देशातील वातावरण पूरक असूनही असा दारूण पराभव झाल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे. 24 वर्षानंतर भारताला असा दिवस पाहायला मिळाला आहे.

IND vs NZ : 24 वर्षानंतर भारतीय संघाने पाहिला नकोसा दिवस, न्यूझीलंडकडून 3-0 ने पराभव
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 3:04 PM

न्यूझीलंडने भारताच्या सर्वच अपेक्षांवर पाणी सोडलं आहे. एकंदरीत या मालिकेवर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित अवलंबून होतं. पण घडलं काही भलतंच..टी20 वर्ल्डकपच्या विजयात मशगूल असलेल्या भारतीय संघाची देशातच नाचक्की झाली. जवळपास 274 वर्षानंतर भारताला देशात क्लिन स्वीप पाहावा लागला आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदा बंगळुरुत, त्यानंतर पुण्यात आणि आता मुंबईत टीम इंडियाला लोळवलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची मजबूत पकड होती. पण टी20 क्रिकेटमुळे भारत डिफेंस करणं विसरून गेल्याचं दिसत आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 146 धावा केल्या आणि विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं. दुसऱ्या डावात ऋषभ पंत वगळता सर्वच फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्मा आणि विराट कोहली वारंवार अपयशी ठरत आहे. पण असं असूनही त्यांच्या चुकांवर पांघरून घातलं जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघावर 121 धावांवर बाद होण्याची वेळ आली. न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात 25 धावांनी विजय मिळवला.

24 वर्षांपूर्वी टीम इंडियाला भारतात कोणत्या संघाने क्लीन स्वीप दिला आहे. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने भारताला लोळवलं होतं. 2000 साली दक्षिण अफ्रिकेने भारताला व्हाईट वॉश दिला होता.  200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरल्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला 120 धावा गाठता आल्या नव्हत्या. गाल्लेमध्ये श्रीलंकेविरुद्ध 2015 साली 176 धावा करता आल्या नव्हत्या. 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध 194 धावांचं लक्ष्य गाठता आलं नव्हतं. आता न्यूझीलंडविरुद्ध 147 धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही.

न्यूझीलंडने दुसऱ्यांदा सर्वात कमी स्कोअर डिफेंड केला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने 46 वर्षांपूर्वी 1978 मध्ये इंग्लंडविरुद्ध 137 धावा डिफेंड केल्या होत्या. इतकंच काय भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये 92 वर्षातील सर्वात मोठा पराभव आहे. कसोटीत भारताला तीन पेक्षा जास्त सामन्यात क्लिन स्वीप करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला आहे. या पराभवासह भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित चुकलं आहे. आता भारताला काहीही करून उर्वरित 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिलं स्थानही गमावलं आहे.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.