IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराहचं प्रमोशन

India squad for Test Series Against New Zealand : न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराहचं प्रमोशन
team india test huddleImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 11:10 PM

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय निवड समितीने न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील 3 सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जसप्रीत बुमराह याला प्रमोशन देण्यात आलं आहे. बुमराहची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चौघांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

इंडिया-न्यूझीलंड कसोटी मालिकेचं आयोजन हे 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात आलं आहे. तर त्यानंतरचे शेवटचे 2 सामने हे महाराष्ट्रात पार पडणार आहेत. दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

टॉम लॅथम न्यूझीलंडचा कॅप्टन

दरम्यान न्यूझीलंडने या मालिकेसाठी याआधीच 17 सदस्यीय संघ जाहीर आहे. टीम साऊथी याच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर टॉम लॅथम याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. न्यूझीलंडला श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिका ही 0-2ने गमवावी लागली होती. टीम साऊथीने या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता टॉम लॅथमची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु

दुसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे

तिसरा सामना, 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.