IND vs NZ : मालिकेत व्हाईटवॉश मिळाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, सरळ म्हणाला काय चुकलं ते

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला 3-0 ने पराभूत करत इतिहास रचला आहे. जिथे एक सामना जिंकणं न्यूझीलंडसाठी कठीण होतं. तिथे अख्खी मालिका जिंकून टीम इंडियाला पराभवाच्या चिखलात लोळवलं आहे. या पराभवामुळे हीच ती टीम इंडिया आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. या मालिका पराभवानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs NZ : मालिकेत व्हाईटवॉश मिळाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, सरळ म्हणाला काय चुकलं ते
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 3:02 PM

न्यूझीलंडने भारताला कसोटी मालिकेत दणदणीत आपटलं आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्नच लांबवलं आहे. त्यामुळे आता पुढचं गणित खूपच किचकट झालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी आता भारताला 5 पैकी 4 सामने जिंकणं भाग आहे. भारतीय संघ याच महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार सामने जिंकणं भारताला कितपत शक्य होईल सांगता येत नाही. भारतातच विजय मिळवणं कठीण झाल्याने या संघाकडून क्रीडाप्रेमींना फार काही अपेक्षा नाहीत. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे पहिल्या दिवसापासून पकड होती. मात्र तिसऱ्या दिवशी नको तेच झालं. पहिल्या डावात 28 धावांची आघाडी असूनही पराभवाची नामुष्की ओढावली. भारताची आघाडी वजा करता न्यूझीलंडने 146 धावा केल्या आणि विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं. पण भारताचा डाव फक्त 121 धावांवर आटोपला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात 25 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या पराभवाचं विश्लेषण रोहित शर्माने करताना काय चुकलं ते सांगून टाकलं.

“आम्ही गेल्या तीन चार वर्षात अशा खेळपट्ट्यांवर खेळलो आहोत. आम्हाला कसं खेळायचं ते माहिती आहे. पण या मालिकेत तसं काही झालं नाही. ही मालिका गमवल्याचं दु:ख असणार आहे. मी फलंदाज आणि कर्णधार म्हणून या मालिकेत अपयशी ठरलो आहे. ही गोष्ट माझ्यासाठी त्रासदायक असेल. त्याचबरोबर आम्ही संघ म्हणून कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळेच आमचा पराभव झाला.” , असं कर्णधार रोहित शर्मा याने मालिका गमावल्यानंतर सांगितलं.

‘तुम्हाला माहीत आहे की, मालिका गमावणे किंवा कसोटी गमावणे हे पचवणे कधीच सोपे नसते. ही गोष्ट सहज पचनी पडत नाही. आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. आम्हाला माहित आहे आणि आम्हाला ते स्वीकारावे लागेल. न्यूझीलंडने आमच्यापेक्षा खूप चांगली कामगिरी केली. आमच्याकडून खूप चुका झाल्या आहेत आणि आम्हाला त्या स्वीकाराव्या लागतील. आम्ही पहिल्या डावात (बेंगळुरू आणि पुण्यात) पुरेशा धावा केल्या नाहीत आणि आम्ही खेळात मागे होतो. पण मुंबईत आम्हाला 30 धावांची आघाडी मिळाली. आम्हाला वाटले की आम्ही पुढे आहोत, लक्ष्य देखील साध्य केले जाऊ शकते. पण तसं झालं नाही’, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.