बंगळुरु कसोटीत टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! पाचव्या दिवशी अशी असेल स्थिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बंगळुरुत सुरु आहे. या सामन्यावर न्यूझीलंडची मजबूत पकड आहे. कारण न्यूझीलंडला एका दिवसात फक्त 107 धावा करायच्या आहेत. तसेच एक पूर्ण दिवस हाती आहे. पण असं असलं तरी भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

बंगळुरु कसोटीत टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! पाचव्या दिवशी अशी असेल स्थिती
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 7:38 PM

भारत न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत चार दिवसांचा खेळ पार पडला आहे. पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर बाद झाल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 402 धावा करत 356 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडत टीम इंडियान न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस पावसाचं सावट असल्याने सामना एक तास आधीच संपवण्यात आला. आता पाचव्या दिवशी न्यूझीलंड संघ सहज जिंकेल अशी स्थिती आहे. कारण 10 विकेट हातात असून 107 धावा सहज गाठण्यासारख्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी पराभव मनोमन मानला आहे. असं असताना भारतीय क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाजी बातमी समोर आली आहे. पाचव्या दिवशीचा खेळ होईल की नाही याबाबत साशंकता आहे. बंगळुरुच 20 ऑक्टोबरला म्हणजेच स्पर्धेच्या पाचव्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, बंगळुरुत 80 टक्के पावसाची शक्यता आहे.

रविवारी संपूर्ण दिवस पाऊस पडला तर सामना ड्रॉ करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान 51 टक्के पाऊस पडू शकतो. त्यानंतर पुढचे दोन तास 47 ते 45 टक्के पाऊस पडेल. दुपारी 1 वाज 49 टक्के, दुपारी 2 वाजता 51 टक्के आणि दुपारी 3 वाजता 55 टक्के पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी 4 वाजता 39 टक्के, संध्याकाळी 5 वाजता 33 टक्के आणि संध्याकाळी 6 वाजता 39 टक्के पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा खंड पडणार हे निश्चित आहे. पण त्यामुळे सामना ड्रॉ होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना ड्रॉ झाला तर न्यूझीलंडचं अंतिम फेरीचं गणित किचकट होईल. दुसरीकडे हा सामना ड्रॉ झाला तर अप्रत्यक्षरित्या टीम इंडियाला फायदा होईल. कारण तसा पण हा सामना भारताच्या पारड्यात नाही. एखादा मोठा चमत्कार घडला तरच विजय मिळवू असं दिसतंय. पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही.

Non Stop LIVE Update
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.