IND vs NZ : हार्दिक पांड्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळणार संधी? दोन खेळाडूंचा असेल दावा
IND vs NZ, World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतासाठी न्यूझीलंड विरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजय सर्वकाही स्पष्ट करणार आहे. पण या सामन्यात हार्दिक पांड्याची उणीव भासणार आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत भारताने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. आता येथून पुढे अंतिम फेरीपर्यंतचा विचार केला तर टीम इंडियाला 7 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे खेळाडूंची फिटनेस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला फटका बसला. हार्दिक पांड्या जखमी झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळणार नाही. हा सामना भारताची पुढची वाटचाल ठरवणार आहे. कारण हार्दिक पांड्या जखमी होणं भारताला परवडणारं नाही. कारण फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात टीम इंडियाला फटका बसणार आहे. हार्दिक पांड्या सामन्यादरम्यान जखमी झाल्याने उर्वरित षटकं पूर्ण करताना रोहित शर्माची चांगलीच दमछाक झाली. आता न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याची जागा कोण भरून काढणार असा प्रश्न आहे. त्यामुळे दोन नावांचा विचार होण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू असल्याने त्या जागी अष्टपैलू खेळाडूलाच संधी मिळू शकते असा एक मतप्रवाह आहे. त्यासाठी आर अश्विन हा योग्य ठरू शकतो. आर अश्विन गोलंदाजीसोबत फलंदाजीतही माहीर आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्याचा विचार होण्याची शक्यता आहे. पाचवा गोलंदाजाची उणीव भरून निघू शकते. त्यामुळे आर. अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता दाट आहे. न्यूझीलंडची बॅटिंग लाइनअप पाहता हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
दुसरीकडे, सूर्यकुमार यादव याचंही नाव चर्चेत आहे. पण सूर्यकुमार यादव संघात आल्यास फक्त फलंदाजीची शेपूट लांब होईल. गोलंदाजीचं उणीव भरून काढण्यात कर्णधार रोहित शर्मा याला कठीण जाईल. म्हणून टीम तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. मोहम्मद शमीच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात असू शकतात. तसेच शार्दुल ठाकुर याला आराम दिला जाऊ शकतो.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), आर अश्विन/सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव