IND vs NZ : पहिल्या 10 षटकांचं टीम इंडियाला टेन्शन! नाणेफेकीचा कौल ठरवणार जय पराजय?
टीम इंडियाने मोठ्या दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा मार्ग रोखला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आहेत.
मुंबई : वनडे वर्ल्डकप जेतेपदापासून टीम इंडिया अवघे दोन विजय दूर आहे. पण हे दोन विजय वाटते तितके सोपे नाहीत. साखळी फेरीसारखी दुरुस्तीची इथे नाही. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून बाद फेरीचा सामना जिंकावाच लागणार आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान आहे. न्यूझीलंडने भारताला अनेकदा पराभवाचं पाणी पाजलं आहे.भारताने साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 5 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरला होणारा सामन्यात कोण बाजी मारणार? हे आता सांगणं खूपच कठीण आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांचं टेन्शन वाढलं असणार आहे. त्यामळे कोच राहुल द्रविड हॉटेल ऐवजी कोचिंग स्टाफसह थेट वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचला.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत वानखेडे मैदानावर एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 3 सामने जिंकला आहे. फक्त ऑस्ट्रेलियाने या मैदानात धावांचा पाठलाग करताना सामना जिंकला आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 201 धावांची खेळी केली होती. खरं तर हा सामना अफगाणिस्तानच्या पारड्यातच होता. त्यामुळे या खेळपट्टीवर पहिली 10 षटकं महत्त्वाची भूमिका बजावतात हे मात्र नक्की..त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकताच पहिल्यांदा फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.
आतापर्यंत झालेल्या 4 सामन्यात पहिल्या 10 षटकात सरासरी 52 धावा झाल्या आहेत. तर एक विकेट पडलेला असतो. हेच गणित दुसऱ्या डावात विचित्र आहे. पहिल्या 10 षटकात 42 धावा होतात आणि 4 गडी बाद झालेले असतात. म्हणजेच रात्री गोलंदाजांना लाइट्स फायदा होतो आणि चेंडू स्विंग करण्यास मदत होते. भारतीय गोलंदाजांनी याचा अनुभव श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात घेतला आहे.
वानखेडे स्टेडियमध्ये 4 सामन्यात 29 च्या सरासरीने वेगवान गोलंदाजांनी 47 विकेट्स घेतल्या आहेत. दोन वेळा पाच गडी बाद करण्यात गोलंदाजांना यश आलं आहे. तर फिरकीपटूना 70 च्या सरासरीने 11 गडी बाद करू शकले आहेत.