IND vs NZ: मुंबई कसोटीत स्पायडर कॅमेरामुळे घडलं असं काही, अखेर पंचांना घ्यावा लागला निर्णय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजयाच्या समान संधी असल्याचं दिसत आहे. कारण पहिल्या डावात भारताकडे फक्त 28 धावांची आघाडी आहे.

IND vs NZ:  मुंबई कसोटीत स्पायडर कॅमेरामुळे घडलं असं काही, अखेर पंचांना घ्यावा लागला निर्णय
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 3:26 PM

न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड आहे. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. त्या बदल्यात भारताने सर्व गडी बाद 263 धावा केल्या आणि फक्त 28 धावांची आघाडी घेतली. अशी सर्व स्थिती सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी असताना एक वेगळात अडसर या सामन्यात पाहायला मिळाला. क्रिकेट सामन्यात सर्वात कॅमेरा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. वेगवेगळ्या अँगलने चित्रीकरण केलं जातं. त्यामुळे पंचांना काही निर्णय घेणं सोपं जातं. पण हाच कॅमेरा मुंबई कसोटीत त्रासदायक ठरला. त्यामुळे पंचांना लंच ब्रेकपूर्वी नाईलाजास्तव एक निर्णय घ्यावा लागला

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्र संपण्यापूर्वी स्पायडर कॅमेऱ्यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे स्पायडर कॅमेरा खाली आल्यानंतर वर काही जाण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे पंचांनी वेळेआधीच लंच ब्रेकचा निर्णय घेतला. यानंतर रवींद्र जडेजाने पहिलं सत्र संपण्याची घोषणा केल्यानंतर पंचांशी चर्चा केली.पण कॅमेऱ्याचा तांत्रिक बिघाड पाहाता त्याने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मैदानातून बाहेर जाऊ लागले. नेमकं तेव्हाच कॅमेऱ्यात हालचाल झाली. पण खेळाडू मैदानाबाहेर जाण्याच्या वेशीवर पोहोचले होते. त्यामुळे लंच ब्रेक लवकर घ्यावा लागला. तसेच दुसऱ्या सत्राचा खेळ लवकर सुरु करावा लागला.

भारताकडून शुबमन गिल, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा फक्त 18 धावा करून बाद झाला. तर विराट कोहली अवघ्या 4 धावांवर बाद झाला. सरफराज खान आणि मोहम्मद सिराजला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे शुबमन गिल आणि ऋषभ पंतच्या खेळीने भारताचा डाव सावरला गेला. अन्यथा तिसऱ्या कसोटीतही कठीण होतं. एजाज पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.