Virat Kohli Selfish | “विराट कोहली याचा पुन्हा स्वार्थीपणा उघड”, सोशल मीडियावर टीका

Virat Kohli IND vs NZ | विराटने बांगलादेशनंतर आता न्यूझीलंड विरुद्धही टीम इंडियाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मात्र त्यानंतरही विराटला स्वार्थी म्हटलं जात आहे.

Virat Kohli Selfish | विराट कोहली याचा पुन्हा स्वार्थीपणा उघड, सोशल मीडियावर टीका
सचिनचा हा विक्रम कधी मोडला जाणार याबाबत माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केलीये. गावसकरांनी वर्ल्ड कपधील एक सामना सांगितला असून त्या संघाविरूद्ध विराट विक्रम मोडेल असं त्यांना वाटत आहे.
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 2:55 AM

धर्मशाळा | विराट कोहली याने न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या 95 धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला सलग पाचव्यांदा विजयी होण्यात यश आलं. तर न्यूझीलंडला अखेर वर्ल्ड कपमध्ये 2003 नंतर पराभूत व्हावं लागलं. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर पाचव्या विजयासाठी 274 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. टीम इंडियाची या धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर थोडा डाव डगमगला. मात्र विराट कोहली याने बाजू लावून धरली आणि टीम इंडियाचं आव्हान कायम ठेवत अखेर विजयाचा मार्ग सोपा केला. मात्र या विजयानंतरही नेटकरी विराटला स्वार्थी म्हणतायेत.

विराटने बांगलादेश विरुद्ध शतकासाठी मॅच शेवटपर्यंत ओढली. टीम इंडियाला काही ओव्हरआधी जिंकता आलं असतं. मात्र विराटने तसं न करता त्याने शतकासाठी मॅच खेचली, असा आरोप नेटकऱ्यांनी केला. त्यानंतर आता विराटने न्यूझीलंड विरुद्ध आपल्या विकेटसाठी सूर्युकमार यादव याला रनआऊट केल्याचं म्हटलं जात आहे. नक्की काय झालं समजून घेऊयात.

नक्की काय झालं?

टीम इंडियाला 274 धावांचा पाठलाग करताना 33 व्या ओव्हरमध्ये चौथा झटका लागला. मिचेल सँटनर याने केएल राहुल याला ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कॅच आऊट केलं. केएलनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यकुमार यादव याच्या क्रिकेट कारकीर्दीतील हा वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना होता. त्यामुळे सूर्याचे चाहते हे त्याचे ट्रेडमार्क फटके आणि खेळी पाहण्यासाठी उत्सूक होते.

ट्रेन्ट बोल्ट 34 वी ओव्हर टाकायला आला. सूर्याने या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर फटका मारुन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विराटचं लक्ष सूर्याऐवजी बॉलकडे होतं. त्यानंतर विराट धावला. या दरम्यान मिचेल सँटनर याने डाईव्ह मारत बॉल अडवला. मात्र तोवर सूर्या नॉन स्ट्राईक एंडवर जवळपास पोहचला होता. तर विराटही धावायला लागला. सँटनर स्ट्राईक एंडच्या दिशेने विकेटकीपर टॉम लॅथमच्या दिशेने बॉल फेकतोय हे सूर्याला लक्षात आलं.

विराट सोशल मीडियावर ट्रोल

सामना रंगतदार स्थितीत होता. त्यात विराट सेट होता. त्यामुळे सूर्याने आपल्या विकेटचं बलिदान दिलं. सूर्या पुन्हा स्ट्राईक एंडच्या दिशेने धावला. मात्र तोवर लॅथमने सूर्याला रन आऊट केलं. आता सूर्याच्या या रनआऊटसाठी नेटकरी विराटला दोषी ठरवत आहेत. विराटने आपल्या विकेटसाठी सूर्याला रन आऊट केलं, असं म्हणतायेत.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.