IND vs NZ | श्रेयस अय्यर यानंतर आणखी एक खेळाडू बाहेर, टीमवर मोठं संकट
क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यर याच्यानंतर आणखी एक मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
हैदराबाद : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 18 जानेवारीपासून सुरुवात होतेय. पहिला सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडिययमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला या मालिकेआधी मोठा झटका लागला. मुंबईकर श्रेयर अय्यर बॅक इंज्युरीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय बीसीसीआयने ट्विटद्वारे माहिती दिली. त्यानंतर आता आणखी एक स्टार आणि मॅचविनर खेळाडू हा ‘आऊट’ झाला आहे.
न्यूझीलंडचा स्टार फिरकी गोलंदाज इश सोढीला दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. सोढीला दुखापत भोवली आहे. या मालिकेत टॉम लॅथम न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. वनडे सीरिजच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत कॅप्टन लॅथमने सोढी पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती दिली.
“सोढीला दुखापत झाल्याने त्याला दुर्देवाने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया लॅथमने दिली.
सोढीची आकडेवारी
सोढीने आतापर्यंत 19 कसोटी, 39 वनडे आणि 88 टी 20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. सोढीने कसोटीत 54, वनडेत 51 आणि टी 20 मध्ये एकूण 111 विकेट्स घेतल्या आहेत. विराट आणि सोढी यांच्यातील रायव्हलरीही शानदार आहे. सोढीने आतापर्यंत विराटला 6 डावांपैकी 3 वेळा आऊट केलं आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्धच्या या वनडे सीरिजमध्ये केल विलियमसन आणि वेगवान गोलंदाज टीम साऊथी सहभागी नाहीत. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तान विरुद्ध खेळले होते. मात्र टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. दोघांवरील वर्कलोड लक्षात घेता टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद
दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर
तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
टीम न्यूझीलंड
टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.