IND vs NZ : ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्माने ऋषभ पंतला झापलं! ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर रंगली चर्चा
भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका आधीच 2-0 ने गमावली आहे. त्यामुळे भारताला तिसरा सामना प्रतिष्ठा राखण्यासाठी काहीही करून जिंकणं गरजेचं आहे. पण भारतीय फलंदाजीचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बॅट काही चालताना दिसत नाही. असं असताना ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत नेटकरी आपआपल्या पद्धतीने अंदाज बांधत आहेत.
न्यूझीलंडने नाणेफेकीचाल कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला 235 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. पण भारतीय फलंदाजी निराशाजनक राहिली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत वगळता एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. भारताचा पहिला डाव अवघ्या 263 धावांवर आटोपला. भारताकडे फक्त 28 धावांची आघाडी आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा फेल गेला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माची बॅट शांतच आहे. त्यामुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्मा अवघ्या 18 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चिंता सतावत आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची अशी फलंदाजी पाहून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्न भंगू शकतं. त्यामुळे क्रीडारसिकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कर्णधार रोहित शर्मा वैतागलेला दिसत आहे. तसेच समोर ऋषभ पंत गप्प उभा असल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ड्रेसिंग रुममधील हा व्हिडीओ पहिल्या दिवशीचा असल्याचं सांगितलं जात आहे. रोहित शर्मा कमी धावांवर बाद झाल्यानंतर निराश झाला होता. दुर्दैवाने ऋषभ पंत राग काढण्यासाठी समोर भेटला. या व्हिडीओत रोहित शर्मा ऋषभ पंतवर राग काढत असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर काही समजवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. पण या दोघांमध्ये नेमकं काय झालं हे काही स्पष्ट नाही. पण रोहित शर्माच्या हावभावावरून तो नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओची पुष्टी आम्ही करत नाहीत.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) November 2, 2024
न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 235 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी चांगली खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारताने सर्व गडी बाद 263 धावा केल्या. भारताकडे 28 धावांची आघाडी आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात गडगडला. 100 धावांवर निम्मा संघ तंबूत गेला आहे. त्यामुळे उर्वरित पाच गडी झटपट बाद करून सामना जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, विल यंगची चिवट खेळी सुरु आहे.