IND vs NZ : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं, मोठा निर्णय घेण्याची आली वेळ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला काहीही करून कमबॅक करावं लागणार आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माला काही मोठे निर्णय घेणं भाग आहे.

IND vs NZ : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं, मोठा निर्णय घेण्याची आली वेळ
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 4:22 PM

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवल्याने टीम इंडियाचं पुढचं गणित बिघडलं आहे. मालिका विजय तर महत्त्वाचा आहेच, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित किचकट होणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. नाहीतर ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडियाची अग्निपरीक्षा असणार आहे. कारण टीम इंडियाचं गणित बिघडलं तर श्रीलंका आणि इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ आपला दावा लावून बसले आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माला काही कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही ना काही बदल करणं भाग असल्याचं दिसत आहे. कारण शुबमन गिल संघात आला तर कोणाला बसवायचं हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे केएल राहुल हा एकमेव पर्याय दिसत आहे. कारण फलंदाजीत तर फेल ठरला आहे. दुसरीकडे, गचाळ क्षेत्ररक्षणामुळे रडारवर आला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा केएल राहुलला संधी देण्याची शक्यता कमीच आहे.

सरफराज खानने पहिल्या कसोटी 150 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मधून वगळणं आता कठीण आहे. त्यामुळे शुबमन गिलची संघात एन्ट्री झाली तर केएल राहुलला बसवण्याशिवाय पर्याय नाही असं दिसत आहे. कारण गेल्या काही कसोटीत केएल राहुल वारंवार फेल होत आहे. वारंवार संधी देऊनही केएल राहुल परीक्षेत पास होताना दिसत नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतही केएल राहुल काही खास करू शकला नाही. त्यामुळे पुणे कसोटीत केएल राहुलला संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

दुसरीकडे, केएल राहुलला कसोटीत आता पुन्हा संधी मिळणं कठीण असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात स्थान मिळते की नाही याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दरम्यान, बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. सध्याच्या संघातून कोणालाच बाहेर केलेलं नाही. पण अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची संघात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळण्याची शक्यता आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग 11 मधून कोणाचा पत्ता कापतो याकडे लक्ष लागून आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.