IND vs NZ | मोहम्मद शमीचा धमाका, टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये, न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय

India vs New Zealand Semi Final | टीम इंडियाने न्यूझीलंडचा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 70 धावांनी धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे.

IND vs NZ | मोहम्मद शमीचा धमाका, टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये, न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 10:40 PM

मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मोहम्मद शमी याने सर्वाधिक 7 विकेट्स घेत न्यूझीलंडचं 48.5  ओव्हरमध्ये  327  धावांवर पॅकअप केलं. विराट कोहली , श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. तसेच टीम इंडियाची ही वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा घेतला.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 134 धावांची खेळी केली. कॅप्टन केन विलियमसन याने 69 धावांचं योगदान दिलं. ग्लेन फिलिप्स 41 धावांवर आऊट झाला. सलामी जोडी डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. टॉम लॅथमन याला भोपळाही फोडू दिला नाही. मिचेल सँटरने आणि टीम साऊथी या दोघांनी प्रत्येकी 9 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 47 धावा केल्या. शुबमन गिल याने नाबाद 80 धावा केल्या. शुबमनला क्रॅममुळे मैदान सोडावं लागलं. त्यानंतर शुबमन गिल शेवटच्या काही षटकांसाठी मैदानात आला आणि त्याने काही धावा जोडल्या. विराट कोहली याने 113 बॉलमध्ये 117 धावा केल्या. मुंबईकर लोकल बॉय श्रेयस अय्यर याने 105 धावांची शतकी खेळी केली. विकेटकीपर केएल राहुलने 39 धावांची नाबाद खेळी केली. तर सूर्यकुमार यादव 1 रनवर आऊट झाला. न्यूझीलंडकडून टीम साऊथी याने 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट याच्या खात्यात 1 विकेट गेली.

टीम इंडिया चौथ्यांदा फायनलमध्ये

दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. त्याआधी टीम इंडिया 2011, 2003 आणि 1983 साली फायनलमध्ये पोहचली होती.

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.