IND vs NZ | विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात भरमैदानात वादावादी! व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli and Rohit sharma Viral Video | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सामन्यादरम्यान काय झालं बघा, व्हीडिओ व्हायरल.
धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 2 अजिंक्य संघ टीम इंडिया आणि न्यूझीलंड हे धर्मशाळा येथील एचपीसीए स्टेडियममध्ये आमनेसामने आहेत. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगसाठी न्यूझीलंडला बोलावलं. टीम इंडियाने न्यूझीलंडला 19 धावांवर 2 झटके देत शानदार सुरुवा केली. न्यूझीलंडने त्यानंतर जोरदार कमबॅक करत टीम इंडियाला धोबीपछाड दिला. रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल या जोडीने न्यूझीलंडसाठी मोठी कामगिरी केली. रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली.
भागीदारी दरम्यान टीम इंडियाच्या रविंद्र जडेजा याने रचिनची 22 आणि मिचेलची 69 धावांवर कॅच सोडली. या संधीचा दोघांनी शानदार फायदा घेतला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची विक्रमी भागीदारी केली. मोहम्मद शमी याने ही जोडी फोडली. शमीने रचीनला 75 धावांवर आऊट केलं. इथून टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं आणि न्यूझीलंडला 50 ओव्हरमध्ये 273 धावांवर ऑलआऊट केलं.
न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 130 धावांची शतकी खेळी केली. तर ग्लेन फिलिप्स याने 23 आणि विल यंग याने 17 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.
रोहित-विराटमध्ये झकाझकी?
न्यूझीलंडच्या बॅटिंग सुरु होती. न्यूझीलंडच्या डावातील 31 ओव्हर पूर्ण झाले. तेव्हा विराट धावून रोहितच्या जवळ आला. विराटने त्यानंतर रोहितसोबत थोडं आक्रमक होत काय तरी सांगत होता. मात्र रोहितने त्याचं एक ऐकलं नाही. विराटच्या बोलण्याकडे रोहित दुर्लक्ष करत होता. मात्र रोहितने त्यानंतर विराटसोबत चर्चा केली. त्यामुळे विराट थोडा शांत झाला आणि परत फिल्डिंगसाठी आपल्या जागेवर परतला. विराट-रोहितमध्ये जे काही झालं त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हीडिओ
Captain Rohit Sharma ignoring Virat Kohli’s fluke opinion on the field.
Take this crown my king ! @ImRo45 👑pic.twitter.com/jnk5xvwEl8
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) October 22, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.