INDvsNZ | श्रेयस अय्यर याच्यानंतर टीम इंडियाचा हा खेळाडू मालिकेतून आऊट होणार?
टीम इंडियातून दुखापतीमुळे श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेला मुकावं लागलं आहे. दरम्यान आता दुखापतीमुळे टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूवर बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.
हैदराबाद : टीम इंडियाने न्यूझीलंडवर पहिल्या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र या दरम्यना एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यर याच्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे टीमबाहेर पडू शकतो. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. या स्टार बॉलरला पहिल्या सामन्यात दुखापत झाली.
मोहम्मद शमीला बॉलिंग करताना न्यूझीलंड डावातील 7 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर दुखापत झाली. शमीने फिन एलेनसमोर बॉल टाकला. एलेनने तो बॉल समोरच्या दिशेने खेळला. फॉलोथ्रू दरम्यान शमीला अडचण येत होती. शमीने स्वत:ला बचावण्याता प्रयत्न केला. मात्र शमीच्या अंगठ्याला बॉल लागला. तात्काळ मैदानात फिजीओ आले. शमीच्या हातावर बर्फाने भरलेल्या थैलीने शेक देण्यात आला. मात्र दुर्देवाने शमीला मैदानाबाहेर जावं लागलं.
शमीला काही वेळ मैदानाबाहेर थांबावं लागलं. मात्र त्यानंतर शमी मैदानात परतला. यावरुन शमीला झालेली दुखापत फार गंभीर नाही, हे निश्चित झालं. शमीने पुन्हा सामन्यातील 23 व्या ओव्हरपासून बॉलिंग टाकायला सुरुवात केली. शमीने 25 व्या ओव्हरमध्ये ग्लेन फिलिप्सला 11 धावांवर बोल्ड केलं.
काही वेळानंतर शमी मैदानात दुखापतीनंतर परतला. मात्र त्यानंतरही शमीच्या दुखापतीमुळे टीम इंडियात टेन्शन आहे. शमीच्या या दुखापतीने डोकं वर काढलं तर शमीला या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यांना मुकावं लागू शकतं. आधीच श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. मात्र जर शमीला बाहेर पडावं लागलं तर टीम इंडियासाठी तो मोठा धक्का असेल.
या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलने धमाकेदार द्विशतक ठोकलं. शुबमनने 208 धावांची खेळी केली. गिलच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने झटपट 6 विकेट्स गमावले. यानंतर मायकल ब्रेसवेलने अखेरपर्यंत झुंज दिली. टीमसाठी शतक ठोकलं. पण त्याला न्यूझीलंडला विजयी करता आलं नाही.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना हा शनिवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका विजयाची संधी आहे. तर न्यूझीलंडला मालिकेतील अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. यामुळे हा सामना रंगतदार ठरणार आहे.
टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (कॅप्टन), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिचेल सैंटनर, लॉकी फर्ग्यूसन, शिप्ले आणि टिकनर.