IND vs NZ : मोहम्मद सिराज आणि कॉनवेमध्ये तू तू मैं मैं, गावस्कर यांनी थेट सांगितलं की… पाहा व्हिडीओ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यावर न्यूझीलंडची मजबूत पकड असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडने 356 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही आघाडी मोडून काढणंच भारतीय संघाला जड जाणार आहे. असं असताना या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात सिराज आणि कॉनवे यांच्या तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भारत न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारताची दाणादाण उडवून दिली. भारताला अवघ्या 46 धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर 402 धावा करत 356 धावांची मोठी आघाडी घेतली. या धावांचा पाठलाग करताना भारताने दोन विकेट गमवल्या आहेत. त्यामुळे विजयाचं पारडं न्यूझीलंडच्या बाजूने झुकलेलं आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत या सामन्यातील निकालाचा फरक दिसणार आहे. भारताने हा सामना गमावला तरी गुणतालिकेत अव्वल स्थानी राहील. पण पुढचा प्रवास मात्र खूपच कठीण असेल हे देखील तितकंच खरं आहे. असं असताना या सामन्यात एक शाब्दिक वाद पाहायला मिळाला. न्यूझीलंडने 3 विकेट गमवून 180 धावा केल्या होत्या. तेव्हा न्यूझीलंडचा फलंदाज डिवॉन कॉनवे आणि मोहम्मद सिराज यांच्यात तू तू मैं मैं पाहायला मिळाली. कॉनवेने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर चौकार मारला. हा शॉट पाहून सिराजच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पुढचा चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद सिराजने कॉनवेला काहीतरी बोलला. त्यावर कॉनवे फक्त हसताना दिसला.
सिराज आणि कॉनवे त्यांच्यातील हा वाद पाहून सुनिल गावस्कर यांनी कॉनवेला खास आठवण करून दिली. मस्करीत सुनिल गावस्कर यांनी कॉनवेला सांगितलं की, विसरू नको तो आता डीएसपी आहे. मी विचार करत होतो की, भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्याला सलामी दिली असेल का? न्यूझीलंड कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी तेलंगाना सरकारने मोहम्मद सिराजची डीएसपीपदी नियुक्ती केली आहे.
When Conway did all the damage to Siraj 🤣🤣
Go back and bowl properly man #INDvNZ #INDvsNZ pic.twitter.com/VYXxrEfxow
— 𝕻𝖔𝖘𝖊𝖎𝖉𝖔𝖓🔱 (@King_Zeus2228) October 17, 2024
भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर डीएसपी करणार असल्याची घोषणा केली होती. आता त्याची अधिकृतपणी या पदावर नियुक्ती झाली आहे. सिराजच्या खांद्यावर आता डीएसपी पदाची जबाबदारी आहे. त्याचा पोलिसांच्या वर्दीतील एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे, कॉनवेला आपलं शतक काही पूर्ण करता आलं नाही. 91 धावसंख्येवर असताना आर अश्विनने त्याला त्रिफळाचीत केलं.