IND vs NZ: न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी बुमराहला विश्रांती आणि पंड्याचं पुनरागमन?

India vs New Zealand Test Series 2024: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

IND vs NZ: न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी बुमराहला विश्रांती आणि पंड्याचं पुनरागमन?
shubman jasprit and viratImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 11:35 PM

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशला मायदेशातील कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश दिला. आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया बांगलादेशला तिसऱ्या सामन्यात पराभूत करुन क्लीन स्वीप करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहितसेनेने आगामी न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरु केली आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवार 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

न्यूझीलंडने या कसोटी मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम साऊथी याच्या राजीनाम्यानंतर टॉम लॅथम हा न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर इथे अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ केव्हा जाहीर होणार? याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून बीजीटीची तयारी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकते. टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या सध्या रेड बॉलने सराव करतोय. त्यामुळे हार्दिकचं कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट आणि आगामी बीजीटीच्या पार्श्वभूमीवर विश्रांती देण्यात येऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु

दुसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे

तिसरा सामना, 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....