IND vs NZ : काय बॉल टाकला राव..! वॉशिंग्टनच्या फिरकीपुढे रचिन रवींद्र चीतपट, एकदा Video पाहाच
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना पुण्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्रात दोन विकेट झटपट गेल्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी डाव सावरला. त्यामुळे रचिन रवींद्रची विकेट डोकेदुखी ठरत होती. अखरे वॉशिंग्टन सुंदरने त्याला मॅजिक बॉल टाकला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने बऱ्यापैकी पकड मिळवली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉम लॅथम, विल यंग हे स्वस्तात बाद झाले. मात्र डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी डाव सावरला. डेवॉन कॉनवेने 141 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. तर रचीन रवींद्रने 105 चेंडूत 65 धावांची खेळी केली. खरं तर रचिन रवींद्र हा भारतासाठी डोकेदुखी ठरतो की काय असं वाटत होतं. न्यूझीलंड पहिल्या दिवशी आरामात 300 पार धावा करणार असं वाटत होतं. त्यामुळे रोहित शर्माने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हे अस्त्र बाहेर काढायचं ठरवलं. वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजी खेळणं या खेळपट्टीवर किवींना कठीण जात असल्याचं दिसून आलं. त्याची प्रचिती पुढच्या काही षटकात आली. वॉशिंग्टन सुंदर जमलेली जोडी फोडली. त्याचबरोबर आणखी दोन विकेट घेत न्यूझीलंडच्या धावांना ब्रेक लावला. कुठे 300 पार धावा जातील असं वाटत असताना वॉशिंग्टनच्या गोलंदाजीमुळे त्याला खिळ बसली असंच म्हणावं लागेल. वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडच्या मधल्या फळीचे शिलेदार फोडले. रचिन रवींद्र, डेरिल मिचेल आणि टॉम ब्लंडेल यांना बाद केलं. यात रचिन रवींद्रची विकेट भारी होती.
रचिन रवींद्रने खेळपट्टीवर जम बसवला होता. पहिल्या कसोटी सामन्यातही रचिनने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्यामुळे त्याची विकेट मिळणं खूपच गरजेचं होतं.अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने ही डोकेदुखी दूर केली. रचिन रवींद्र असा चेंडू टाकला की त्याच्या पुढ्यातून विकेट घेऊन गेला. त्याला काही कळायच्या आधीच स्टंप उडाला होता. त्यामुळे त्याला काही जास्त विचार करता आला नाही. रचिन रवींद्रने 105 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या.
🚨 WASHINGTON SUNDAR PRODUCE THE BALL OF THE SERIES 🚨 pic.twitter.com/vLvo4ipYAY
— Johns. (@CricCrazyJohns) October 24, 2024
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडला सलग दोन कसोटी सामन्यात पराभूत केलं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अव्वल स्थान कायम राहील. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने जिंकले तरी अंतिम फेरीचं स्वप्न पूर्ण होईल.