IND vs PAK : शाहिन आफ्रिदीकडून विराट कोहली, रोहित शर्माचा ‘टप्प्यात’ कार्यक्रम, पाहा Video
Shaheen Afridi Bold Virat Kohli and Rohit Sharma : पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आऊट करत संपूर्ण सामना पालटवला आहे.
मुंबई : आशिया कप 2023मध्ये सुरू असलेल्या टीम इंडिया आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पुन्हा मुख्य खेळाडूंनी नांगी टाकली आहे. पाकिस्तान संघाचा स्ट्राईक बॉलर शाहिन शाह आफ्रिदीने टीम इंडियाच्या चिंधड्या उडवल्यासारखा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे बोल्ड काढले आहेत. सपशेल दोन्ही खेळाडू शाहिनच्या ट्रॅपमध्ये अडकवत त्यांचा कार्यक्रम आटोपता घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:-
Inject this In My Veins ♥️🦅#ShaheenShahAfridi #AsiaCup2023#PAKvIND #INDvsPAK pic.twitter.com/BQSPdXQNGD
— Maheen🖤🇵🇰 (@mahi5621_) September 2, 2023
Shaheen Afridi – The best bowler in the world.
He has dismissed both Rohit Sharma & Virat Kohli.#AsiaCup2023 #INDvsPAK pic.twitter.com/yyAwMWpJds
— Abdullah Neaz (@Abdullah__Neaz) September 2, 2023
रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल होता. सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल आले होते दोघांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र पाचव्या ओव्हरमध्ये पाऊस आला आणि सामना काहीवेळ थांबवण्यात आला होता. पाऊस थांबल्यावर सामना परत सुरू झाला आणि टीम इंडियाचा पळता काळ सुरू झाला, कारण शाहिन आफ्रिदीने सुरूंग लावला.
रोहितला बाहेर बॉल टाकत अडकवलं त्यानंतर एक बॉल आत टाकला तो बॉल खेळायला रोहित यशस्वी ठरला नाही. रोहितला ट्रॅप लावून शाहिनशाहने आऊट केलं. तशाच प्रकारे शाहिन शाहने विराट कोहलीलाही आपल्या जाळ्यात अडकवलं. विराटही बाहेरचा बॉल मारायला गेला आणि बॉल बॅटचा किनारा घेऊन स्टम्पवर बसला. अशा प्रकारे टीम इंडियाच्या दोन्ही प्राईज विकेट शाहिनने घेतल्या.
दरम्यान, श्रेयस अय्यर आल्यावर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत त्याने दोन चौकार मारले. अय्यर डाव सावरणार असं वाटलं होतं मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो कॅच आऊट झाला. आता मैदानात इशान किशन आणि शुबमन गिल दोघे असून सावधपणे खेळत आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.