IND vs PAK | पाकिस्तान विरुद्धच्या Playing 11 मधून टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला डच्चू!
Asia Cup 2023 India vs Pakistan | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया या आशिया कपमधील सर्वात मोठ्या सामन्यासाठी क्रीडा विश्व सज्ज झालं आहे. कॅप्टन रोहित या साम्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये धोनीच्या लाडक्याला वगळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेला शानदार सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आमनेसामने होते. पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत धडाक्यात सुरुवात केली. पाकिस्तानला आता सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी आणखी एक सामना जिंकायचा आहे. पाकिस्तान ए ग्रुपमधील साखळी फेरीतील दुसरा आणि शेवटचा सामना टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 सप्टेंबरला पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांसह क्रीडा विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
पाकिस्तान आणिन टीम इंडिया या दोन्ही टीमसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा नेट्समध्ये जोरदार सराव सुरु आहे. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यायची ही टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मा याच्यासाठी मोठी डोकेदुखी असणार आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव याच्या जागेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कुलदीप यादव याची आशिया कपसाठी टीम इंडियात मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर कुलदीपला संधी द्यायची की ऑलराउंडर अक्षर पटेल याला, असा सवाल टीम मॅनेजमेंटसमोर आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी रविंद्र जडेजा याला संधी मिळणार हे निश्चितच आहे. मात्र विषय असा आहे की, अक्षर पटेल हा ऑलराउंडर आहे.
अक्षर बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही भूमिका चोख पार पाडतो. तर कुलदीप फक्त बॉलिंगनेच योगदान देतो. त्यामुळे अक्षर की कुलदीप या दोघांपैकी रविंद्र जडेजा याची कोण साथ देणार, याबाबत निर्णय घेणं हे टीम मॅनेजमेंटसाठी आव्हानात्मक असणार आहे.
आशिया कप 2023 साठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.