India vs Pakistan | टीम इंडियाची चौकडी पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच भिडणार, कोण आहेत ते?

India vs Pakistan Asia Cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेतील तिसरा सामना हा ऐतिहासिक असणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.

India vs Pakistan | टीम इंडियाची चौकडी पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच भिडणार, कोण आहेत ते?
गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाची प्लेइंग 11 निश्चित नाही. त्यामुळे संघ स्थिर दिसत नाही. कारण संघाचे प्रमुख चार फलंदाज हेसुद्धा माहित नाहीआणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल हेसुद्धा काही नक्की नाही, असं शोएब अख्तर याने म्हटलं आहे.
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 10:36 PM

कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून झाली. या स्पर्धेतील पहिला सामना हा पाकिस्तानने 238 धावांनी जिंकला. पाकिस्तानचा हा वनडे क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. पाकिस्तानने नेपाळला विजयासाठी 343 धावांचं आव्हान दिलं होतं, पण नेपाळ 104 धावांवरच ऑलआऊट झाली. पाकिस्ताने आशिया कपमध्ये विजयी सुरुवात केली. पाकिस्तानला आता सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी एका सामन्यापासून दूर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना हा टीम इंडिया विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम आणि दोन्ही देश उत्सुक आहेत. या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच खेळणार आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या तब्बल 4 खेळाडूंचा समावेश असणार आहे. या चौघांमध्ये शुबमन गिल, श्रेयस अय्यर, विकेटकीपर बॅट्समन इशान किशन आणि मोहम्मद सिराज हे आहेत. या चौघांना पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तसेच सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनाही संधी मिळाली तर, त्यांचीही पाकिस्तान विरुद्धची पहिलीच वेळ ठरेल.

टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2023 मध्ये 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. याआधी वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये हे चीर प्रतिद्वंदी भिडले होते. तेव्हा टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

आशिया कपमध्ये भारत-पाक 3 वेळा आमनेसामने?

दरम्यान आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान दोन्ही संघांचा तब्बल 3 वेळा आमनासामना होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ जर फायनलमध्ये पोहचले, तर 3 वेळा सामना होईल.

आशिया कप 2023 साठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.