IND vs PAK: रोहितने विजयात निर्णायक योगदान बजावणाऱ्या बुमराहबाबत म्हटलं….
Rohit Sharma On Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा जसप्रीत बुमराहबद्दल काय म्हणाला?
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 120 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर या धावांसमोर फक्त 113 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय ठरला. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप इतिहासात पाकिस्तान विरुद्ध झिंब्बावेनंतर दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. झिंबाब्वेने पाकिस्तान विरुद्ध 119 धावांचा बचाव केला होता. टीम इंडियाचा हा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा सातवा विजय ठरला. जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.
फलंदाज अपयशी ठरल्यांनतर भारतीय गोलंदाजांनी चोखपणे भूमिका पार पाडली. मात्र इतर गोलंदाजांच्या तुलनेत बुमराहची कामगिरी सरस ठरली. बुमराहने 4 ओव्हरमध्ये 3.50 च्या इकॉनॉमी रेटने 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. बुमराहला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. टीम इंडियाच्या विजयानंतर समारोप कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्माने बुमराहच्या कामगिरीचं कौतुक केलं. रोहित शर्मा काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
रोहित बुमराहबाबत काय म्हणाला?
“तो दिवसेंदिवस बलवान होत चालला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की तो काय करु शकतो. मी त्याच्याबाबत फार बोलणार नाही. त्याने संपूर्ण वर्ल्ड कप दरम्यान अशाच मानसकतेने खेळावं. तो एक प्रतिभावान व्यक्ती आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे”, असं रोहितने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं. तसेच रोहितने क्रिकेट चाहत्यांबाबतही प्रतिक्रिया दिली.
“आम्ही जिथे जातो तिथे ते निराशा करत नाहीत. मला विश्वास आहे की ती आनंदानं घरी परततील. ही तर सुरुवात आहे, आता आम्हाला आणखी दूरचा पल्ला गाठायला आहे”, असंही रोहितने नमूद केलं.
रोहितची बुमराहबाबत प्रतिक्रिया
“He’s going from strength to strength” 💪
Rohit Sharma on the impact of Jasprit Bumrah 🔥 pic.twitter.com/jMZLiILwcd
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 9, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.