IND vs PAK : रिझर्व्ह डे दिवशी कसं असेल हवामान? सामना होणार की नाही? ते जाणून घ्या

Asia Cup 2023, IND vs PAK : भारत पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. यामुळे नियोजित दिवसाचा खेळ थांबवला असून राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. पण राखीव दिवशी कसं असेल वातावरण याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

IND vs PAK : रिझर्व्ह डे दिवशी कसं असेल हवामान? सामना होणार की नाही? ते जाणून घ्या
IND vs PAK : दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला, आता रिझर्व्ह डे दिवशी कसं असेल हवामान ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 10:14 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेचा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळखंडोबा झाला आहे. आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत रंगलेला भारत पाकिस्तान सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर सुपर 4 फेरीतील सामना तरी व्यवस्थित होईल अशी आशा होती. पण या सामन्यातही पावसाने हजेरी लावली आणि हिरमोड झाला. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्याने आता हा सामना थांबला तेथून 11 सप्टेंबरला सुरु होणार आहे. पण या दिवशी पाऊस असेल की नसेल. सामाना होईल की नाही? असे अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत. श्रीलंकेतील प्रेमदासा मैदानात राखीव दिवशी कसं असेल हवामान याबाबत जाणून घेऊयात.

राखीव दिवशी कसं असेल वातावरण

भारत पाकिस्तान सामन्याच्या राखीव दिवसावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होईल अशी शक्यता कमीच आहे. Accuweather च्या अंदाजानुसार, राखीव दिवशी पाऊस होईल 99 टक्के शक्यता आहे. त्यामुळे हा सामना होणं अशक्य असं म्हंटलं तर हरकत नाही. दिवसभर आभाळ दाटलेलं राहील. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग 41 किमी प्रतितास इतका असेल. कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियस, तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस असेल.

पाऊस सुरु राहिला तर डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 20 षटकात 181 धावांचं आव्हान दिलं जाईल.पण पाऊस सुरुच राहिला तर मात्र सामना रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशात दोन्ही संघांना सुपर फोर फेरीत प्रत्येकी एक गुण दिला जाईल. त्यामुळे भारताला बांगलादेश विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.

Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.