IND vs PAK Weather | पाऊस महामुकाबल्याची वाट लावणार!
India vs Pakistan Weather Forecast | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडियाचे सराव सामने हे पावसामुळे रद्द झाले. आता टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत हवामान खात्याने काय सांगितलंय जाणून घ्या.
अहमदाबाद | टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी या वनडे वर्ल्ड कप 2023 मधील खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ या सामन्यसाठी सज्ज आहे. तिसरा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. मात्र या सामन्यात हवामान मोठी भूमिका बजावणार आहे. सामन्यादरम्यान हवामान कसं असेल, जाणून घेऊयात.
क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याचं उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यासाठी मुंबईतून विशेष रेल्वे सोडण्यत आल्या आहेत. सामन्याच्यी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या सामन्याला मोठ्या उत्साहात क्रिकेट चाहते उपस्थिती लावणार आहेत. मात्र पाऊस या सामन्याची वाट लावयला तयार आहे. आयएमडी अर्थात भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितानुसार, सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 14 आणि 15 ऑक्टोबरला रिमझिम पाऊस होऊ शकतो. “गुजरातमध्ये पुढील 5 दिवसात हवामान शुष्क राहण्याची आशा आहे. अहमदाबादमधील विविध जिल्ह्यांमध्ये 14 ऑक्टोबर रोजी वरुणराजा हजेरी लावू शकतो.”, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पावसामुळे खेळ थांबल्यास क्रिकेट चाहत्यांची निराशा होऊ शकते. त्यामुळे आता हवामान खात्याचा अंदाज पाऊस हजेरी लावून खरा ठरवतो की विनाअडथळा सामना पार पडतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.