अहमदाबाद | आशिया कप 2023 नंतर टीम इंडिया-पाकिस्तान हे दोन्ही संघ आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 14 ऑक्टोबरला हा सामना आयोजित करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा विश्वास हा दुणावलेला आहे. अशात टीम इंडिया आणि पाकिस्तान या महामुकाबल्यासाठी तयार आहेत. या सामन्याच्या काही तासांआधी टीम इंडियासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार मॅचविनर ओपनर शुबमन गिल याच्याबाबत मोठी अपडेट समोर आल आहे. शुबमन गिल याला आजारपणामुळे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे शुबमनच्या जागी ईशान किशन याला संधी देण्यात आली होती. मात्र आता पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियासाठी एक गूड न्यूज आली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने ही बातमी दिली आहे.
शुबमन गिल पाकिस्तान विरुद्ध खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. पाकिस्तान विरुद्ध सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. रोहितने या पत्रकार परिषदेत शुबमनबाबत माहिती दिली. रोहितने दिलेल्या माहितीनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
“शुबमन गिल पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी 99 टक्के उपलब्ध आहे. तसेच आर अश्विन हा खेळणार की नाही, हे खेळपट्टीवर अवलंबून आहे”, असं रोहित शर्मा म्हणाला. आता शुबमन गिल परतला तर ईशान किशन याला बाहेर बसावं लागणार हे निश्चित आहे. दरम्यान शुबमनने अहमदाबादमधील खेळपट्टीची पाहणी केली. तसेच हातात बॅट घेऊन खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. शुबमनचे या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शुबमन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टकाटक
Will Shubman Gill be fit to take on Pakistan at the #CWC23 on Saturday 🤔
Skipper Rohit Sharma has provided the latest update ahead of #INDvPAK 👇https://t.co/5M3Fvu9Ktx
— ICC (@ICC) October 13, 2023
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.