IND vs PAK Live Streaming | अहमदाबादमध्ये टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, मॅच फुकटात कुठे पाहता येणार?
India vs Pakistan Live Streaming Marathi News | टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स पाकिस्तानला धोबीपछाड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर फ्रीमध्ये पाहायला कुठे मिळेल हे बघा.
अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ न्यूझीलंडनंतर विजयी हॅटट्रिक करण्यासाठी तयार आहे. मात्र एका टीमचचं हे स्वप्न पूर्ण होईल. मात्र सामना हा रंगतदार आणि चुरशीचा होणार इतकं मात्र नक्कीच. हा सामना कधी सुरु होईल, सामना फुकटात टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे खेळवण्यात येणार?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर फुकटात डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.