Ind Vs Pak: पाकिस्तानला हरवलं, पण या पाकिस्तानी बॉलरचं भारतीय फॅन्सकडून कौतुक
दुबईच्या उन्हामुळे सगळ्यांनाच खेळणे सोपे नव्हते. नसीम शाहच्या बाबतीतही असेच घडले. डावाच्या 18व्या षटकात तो गोलंदाजी करत असताना त्याला वेदना जाणवत होत्या. तरीही तो खेळत राहिला. वाचा...
नवी दिल्ली : आशिया चषकामध्ये (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला (IND vs PAK) पराभूत करत विजयावर शिक्कामोर्तब केला. याचवेळी पाकिस्तानच्या (Pakistan) एका खेळाडूची मात्र चांगलीच चर्चा रंगली. तो खेळाडू नेमका कोण होता, काल देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये भारताच्या विजयाचा अफगाणिस्तानमध्ये आनंद व्यक्त करताना लोक दिसत होते. यातच आता पाकिस्तानच्या एका खेळाडूची चांगलीच चर्चा रंगली आहे. पाकिस्तान हरलेला असताना त्या खेळाडूची चर्चा देखील चांगली होत आहे. खेळामध्ये जय पराजय होत असतो, यश-अपयश हे ठरलेलं नसतं. खेळात एखादा खेळाडू चांगला कामगिरी करतो किंवा एखादा खेळाडू फारशी चांगली कामगिरी करत नाही. पण, काही खेळाडूंची चांगलीच चर्चा देखील होते. अशाच एका पाकिस्तानाची खेळाडूविषयी आम्ही सांगणार आहोत.
हे ट्विट पाहा
Whether you are Indian or Pakistani ???? you have to accept the fact that Naseem Shah is the fighter. You won the hearts of every cricket lover pic.twitter.com/DVLKGXEJaZ
— Vipin Jaiswal (@VipinJa35249617) August 28, 2022
Naseem Shah Appreciation Tweet
I just have to stand & applaud this young man’s efforts. PAK were defending just 148 & Naseem Shah, with his 2/27, gave it his 150% to keep PAK in the contest on debut in a high-profile clash. He showed immense courage fighting cramps – respect ❤️ pic.twitter.com/Ofy4dsDLAv
— Sivy Kanefied (@Sivy_KW578) August 28, 2022
वेदना होत असताना खेळला
पाकिस्तानचा 19 वर्षीय गोलंदाज नसीम शाह या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रविवारी यानं सामना खेळला आणि त्यानंतर त्याची चांगलीच चर्चा सुरू झाली. पण असं असलं तरी नसीमची सामन्यादरम्यान स्थिती प्रचंड खराब झाली होती. रविवारच्या सामन्यात नसीमनं 4 षटकात 27 धावा देत दोन विकेट घेतल्या. दुबईच्या उन्हामुळे सगळ्यांनाच खेळणे सोपे नव्हते. नसीम शाहच्या बाबतीतही असेच घडले की सतत गोलंदाजी करताना तो अस्वस्थ झाला. डावाच्या 18व्या षटकात तो गोलंदाजी करत असताना त्याला इतका वेदना जाणवत होत्या की तो जमिनीवर पडून राहिला.
हे ट्विट पाहा
HERO OF THE GAME ? NASEEM SHAH pic.twitter.com/HOGrQzNFHS
— Advocate Shahwar Ahmed (@RealEarlyRiser) August 28, 2022
सोशल मीडियावर नसीमचं कौतुक
17.4 षटकात नसीम शाहने वेदना होत असताना चेंडू टाकला तेव्हा त्याने रवींद्र जडेजाविरुद्ध एलबीडब्ल्यूचे आवाहन केले. यादरम्यान त्याला खूप जोरात त्रास होऊ लागला. तो जमिनीवर पडला. यादरम्यान, फिजिओ लगेच मैदानावर आले, त्यांची तपासणी केली. यानंतर काही ड्रिंक्स देण्यात आले आणि नसीम शाहने त्याचे ओव्हर पूर्णपणे फेकले. सोशल मीडियावर प्रत्येकजण नसीम शाहचे कौतुक करत आहे. कारण पहिला सामना झाल्यानंतरही त्याने वेदनांना घाबरला नाही आणि आपला स्पेल पूर्ण केला. भारताचे चाहते असोत वा पाकिस्तानचे चाहते, प्रत्येकजण नसीम शाह यांच्या समर्पणाचे चाहते झाले.
कोण आहेत नसीम शाह?
19 वर्षीय नसीम शाहने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 3 एकदिवसीय सामने खेळले असून 11.10 च्या सरासरीने 10 बळी घेतले आहेत. यादरम्यान 33 धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर नसीमने 13 सामन्यात 36.30 च्या सरासरीने 33 बळी घेतले आहेत. कसोटीत नसीमने एकदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. नसीमच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 44 आणि टी-20 मध्ये 45 विकेट आहेत.