IND vs PAK : पराभवानंतर बाबर आझमने सांगितली नेमकी चूक कुठे झाली? रोहित शर्माबाबत केलं मोठं विधान

IND vs PAK, World Cup 2023 : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याचा अखेर निकाल लागला आहे. एक लाख प्रेक्षकांसमोर पाकिस्तानचा दारूण पराभव झाला आहे. भारताने 7 गडी राखून विजय मिळवला आहे.

IND vs PAK : पराभवानंतर बाबर आझमने सांगितली नेमकी चूक कुठे झाली? रोहित शर्माबाबत केलं मोठं विधान
IND vs PAK : पराभवानंतर पाकिस्तानला बसला मोठा धक्का, बाबर आझमने पराभवाबाबत सर्वकाही सांगून टाकलंImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 9:57 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. दोन्ही संघात तुल्यबल लढत होईल अशी आशा होती. पण भारताने पाकिस्तानला चीतपट करून टाकलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने फलंदाजीला येत आश्वासक सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तान आरामात 270 ते 300 धावा करेल असा अंदाज होता. मात्र सर्व गणित मधल्या फळीत फिस्कटून गेलं. एकापाठोपाठ एक गडी तंबूत परतले. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 191 धावांवरच आटोपला. भारताला विजयासाठी दिलेलं लक्ष्य एकदम सोपं होतं. त्यामुळे भारताचा विजय पहिल्या डावानंतरच निश्चित झाला होता. भारताने तीन गडी गमवून 30.3 षटकात हे आव्हान पूर्ण केलं. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपलं मत स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाला बाबर आझम?

“आम्ही चांगली सुरुवात केली. माझ्यात आणि इमाममध्ये चांगली भागीदारी झाली होती. मला आणि रिझवानला नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायचे होते. अचानक आम्ही कोलमडलो आणि पुन्हा सावरलोच नाहीत. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, तेव्हा आम्हाला वाटलं की 280-290 धावा करू. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. रोहित ज्या प्रकारे खेळत आहे. खरंच त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.”, असं बाबर आझम म्हणाला.

पाकिस्तानने सुरुवातील दुबळ्या संघांसोबत विजय मिळवला आहे. त्यामुळे पुढे आणखी कठीण संघ असणार आहेत. त्यात विजयी मिळवून उपांत्य फेरीच्या लढतीत कायम राहणं ही मोठी परीक्षा आहे. एखाद दोन मोठ्या फरकाने पराभव झाले तर मात्र साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल.

भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. टीम इंडियाने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.भारताचा पुढचा सामना बांगलादेशसोबत 19 ऑक्टोबरला आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी लढत होईल. इंग्लंडसोबत 29 ऑक्टोबर, श्रीलंकेशी 2 नोव्हेंबर, दक्षिण आफ्रिकेशी 5 नोव्हेंबर आणि नेदरलँडशी 12 नोव्हेंबरला सामना होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.