IND vs PAK : कर्णधार रोहित शर्मा कॅमेरामनवर भडकला, झालं असं की…Watch Video

IND vs PAK, Asia Cup 2023 : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. इशान किशन आणि हार्दिक पांड्याच्या खेळीमुळे भारताचा डाव सावरला. पण रोहित शर्मा संतापल्याचं पाहायला मिळालं.

IND vs PAK : कर्णधार रोहित शर्मा कॅमेरामनवर भडकला, झालं असं की...Watch Video
Video : कॅमेरामनच्या त्या कृतीने कर्णधार रोहित शर्मा आला राग, त्याच्याकडे पाहून असं काही केलं
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 7:28 PM

मुंबई : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थिती आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रोहित शर्मा याने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीपुढे संपूर्ण टॉप ऑर्डर फेल ठरली. पण पाचव्या गड्यासाठी इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जबरदस्त खेळी केली. पाकिस्तानी गोलंदाजांना करो की सळो करून सोडलं. दुसरीकडे, सामना सुरु असताना दोन वेळा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवावा लागला होता. पहिल्यांदा पाचवं षटक सुरु असताना सामना थांबवण्यात आला. पावसामुळे सामना थांबला तेव्हा रोहित शर्मा डग आऊटमध्ये बसला होता आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा करत होता. रोहित आणि शुबमन यांनी हेल्मेट घातलं होतं. यावेळी कॅमेऱ्याची नजर रोहित शर्मा याच्यावर होती.

रोहित शर्मा याने नेमकं काय केलं?

रोहित शर्मा कॅमेऱ्यापासून स्वत:ला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण कॅमेरामनं त्याच्या जवळ येऊन उभा राहीला आणि शूट करू लागला. तेव्हा कर्णधार रोहीत शर्मा याला राग आला. त्याने तात्काळ कॅमेरामनला तेथून जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा कॅमेरामनला रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगत असल्याचं यात दिसत आहे.

रोहित शर्मा या सामन्यात काही खास करू शकला नाही. पावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरु झाला. मात्र शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. शाहीन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने दोन चौकारांच्या मदतीने 22 चेंडूत 11 धावा केल्या. रोहित शर्मा 2021 पासून वनडे क्रिकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध अडखळतच खेळला आहे. त्याने डावखुऱ्या गोलंदाजांचे 147 चेंडू खेळला आहे. यात त्याने 138 धावा केल्या आणि सहा वेळा आऊट झाला आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 93.87 इतका आहे. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने चार आणि हारिस रौफ याने तीन गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.