IND vs PAK : मोहम्मद रिझवानला मिळाली नशिबाची साथ, पंचांनी आउट दिलं होतं पण…Watch Video
भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यात झटपट विकेट घेण्याचा गोलंदाजांचा प्रयत्न आहे. दोन विकेट घेण्यात यश आलं. पण मोहम्मद रिझवानची विकेट घेताना झालं असं की...
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 12वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने खेळाडूंवर जबरदस्त प्रेशर असल्याचं दिसत आहे. या व्यतिरिक्त वर्ल्डकपमधील पराभवाची नामुष्की टाळण्याचं पाकिस्तानवर दडपण आहे. दुसरीकडे रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी भारताची धडपड आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली.पाटा विकेट असल्याने या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी राहणार यात शंका नाही. पण सुरुवातीचे विकेट झटपट बाद करण्याचं दडपण बॉलर्सवर असणार आहे. त्यामुळे तसा प्रयत्न सुरु आहे. सुरुवातीचे दोन गडी बाद करण्यात मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या याला यश आलं. त्यानंतर तिसरा गडी बाद करण्याचं भाग्य रवींद्र जडेजाला लाभलं खरं पण डीआरएसमध्ये सर्व गणितच गणलं.
कर्णधार रोहित शर्मा याने 14वं षटक रवींद्र जडेजाला सोपवलं. समोर फॉर्मात असलेला मोहम्मद रिझवान होता. जडेजाने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसरा चेंडू त्याच्या पायावर जाऊन आदळला आणि जोरदार एलबीडब्ल्यूसाठी अपील करण्यात आली. पंचांनी तात्काळ बाद दिला. मग बाबर आणि रिझवानने चचर्चा केली आणि डीआरएस घेतला आणि नाबाद असल्याचं कळलं.
Lucky #Rizwan #Drs #CWC2023 #WorldCup2023 #INDvPAK pic.twitter.com/2uCcvTpyit
— Apolitical Prani (@ApoliticalPrani) October 14, 2023
Rizwan saved by DRS#IndiavsPak #IndiaVsPakistan pic.twitter.com/BiX3AGQYcY
— Ashish Patil (@ashcheekuvk) October 14, 2023
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान याने तिसऱ्या गड्यासाठी 60 हून अधिक धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत होणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.