Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इशान आणि श्रेयस यांच्यावर दबाव! गौतम गंभीरनं सांगितला उपाय

World Cup 2023, IND vs PAK : भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की त्याला युद्धासारखं स्वरुप येतं. त्यामुळे खेळाडूंवरही निश्चितच दबाव येतो. त्यामुळे गौतम गंभीर याने इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना जालीम उपाय सुचवला आहे.

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इशान आणि श्रेयस यांच्यावर दबाव! गौतम गंभीरनं सांगितला उपाय
IND vs PAK : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर असेल दडपण, गौतम गंभीरने सांगितला जालीम तोडगा
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 3:49 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. जाहिरातीच्या माध्यमातून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. चाहतेही सोशल मीडियावर एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. 7 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे पुन्हा एकदा भारताला ‘मौका’ असल्याची चर्चा आहे. पण क्रिकेट हा एक खेळ आहे. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. पण यामुळे खेळाडूंवर दबाव येतो यात शंका नाही. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीर याने काही खास टीप्स दिल्या आहेत. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दबाव कसा दूर करायचा, याबाबत तोडगा सांगितलं आहे.

काय म्हणाला गौतम गंभीर?

गौतम गंभीर याने सांगितलं की, ‘दोघांचा फॉर्म चांगला आहे. त्यांनी फक्त क्रिकेटवर फोकस करावं. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावं.’ गौतम गंभीर याने सल्ला देताना सांगितलं की, “रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर तितका दबाव नसेल. पण इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर दबाव असेल.”

“दबाव असणं यात काही मोठं नाही. कारण एक लाख लोकांसमोर खेळणार. तुम्ही जिथे जाल तिथे सांगितलं जाईल की हा सामना हारू नका. त्यामुळे खेळाडूंवर दबाव असेलच. पण खेळाडूंनी क्रिकेटवर फोकस करावं . तसेच या गोष्टींपासून दूर राहावं. सर्वांचा फॉर्म चांगला आहे. त्यामुळे स्पर्धेकडे बघा आणि सामन्याकडे नको. लोकं काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. आजपासून सामना होईपर्यंत ईयर पॉड लावून फिरा. बाहेरच्या लोकांचं ऐकणं जितकं टाळात तितकं बरं होईल.”, असं गौतम गंभीर म्हणाला.

इशान किशन आणि श्रेयस अय्यर

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इशान आणि श्रेयसची सुरुवात एकदम खराब झाली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दोघंही शून्यावर बाद झाले होते. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इशान किशनने कमबॅक केलं आणि 47 चेंडूत 47 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. श्रेयस अय्यरने 23 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. यात एक उत्तुंग षटकार देखील मारला.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.