IND vs PAK : तुझा माझ्यावं भरवसा नाही का? कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर हा ना करता घेतला रिव्ह्यू आणि…

India vs Pakistan : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. एक लाख लोकांच्या उपस्थितीत हा सामना होत आहे. त्यामुळे खेळाडूंवर दडपण दिसत आहे. त्यामुळे डीआरएस वगैरे निर्णय चुकू नये अशी भीती असते.

IND vs PAK : तुझा माझ्यावं भरवसा नाही का? कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर हा ना करता घेतला रिव्ह्यू आणि...
IND vs PAK : डीआरएस घ्यायचा की नाही? असं सुरु असताना कर्णधार रोहित शर्मा याने ठरवलं आणि...Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 4:57 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखण्याचं टीम इंडियासमोर आव्हान आहे. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं कठीण जाऊ शकतं. हायव्होल्टेज सामन्यात एक चूक चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळे हाती असलेले डीआरएस रिव्ह्यू घेताना दोन्ही संघाचे खेळाडू काळजी घेत आहेत. पहिल्या डीआरएसमध्ये मोहम्मद रिझवानला फायदा झाला. त्यानंतर दुसऱ्या डीआरएसमध्ये रोहित शर्माला नशिबाची साथ मिळाली.

रोहित शर्मा याने पाकिस्तान चांगली खेळी करत 33 वं षटक कुलदीप यादव याच्याकडे सोपवलं. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा रोहित शर्मा होत्या. अपेक्षेप्रमाणे पहिला चेंडू कुलदीप यादव याने सउद शकील याला निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर फटका चुकला थेट पॅडवर आदळला. यामुळे जोरदार अपील करण्यात आली. पंचांच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. त्यामुळे आऊट की नॉट आऊट या संभ्रमात शेवटचे काही 4 सेकंद असताना रोहितने रिव्ह्यू घेतला.

रोहित शर्मा याने घेतलेला रिव्ह्यू वाया जातो की काय असा प्रश्न पडला होता. पण जेव्हा रिव्ह्यू पाहिला गेला. तेव्हा सउद शकील बाद असल्याचं स्पष्ट झालं आणि रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसला. सउद शकील अवघ्या 6 धावा करून बाद झाला. या विकेटनंतर पाकिस्तानवर दबाव वाढला आणि टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघाने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे एकूण 4 गुण आहेत. त्यामुळे या सामन्यातील जय पराजयामुळे गुणतालिकेवर फरक दिसून येईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.