IND vs PAK : कोहली आणि आफ्रिदीमध्ये कोण मारणार बाजी? हरभजनने स्पष्टच सांगितलं की…
IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत. या सामन्यात आणखी एक द्वंद्व पाहायला मिळणार आहे ते म्हणजे विराट कोहली आणि शाहीन आफ्रिदी..यात कोण बाजी मारणार याबाबत हरभजन सिंगने स्पष्ट सांगितलं आहे.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी स्टेडियममधील सर्व तिकीटं संपली आहेत. 1 लाख क्षमतेचं मैदान पूर्ण प्रेक्षकांनी भरलेलं असणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व अधोरेखित होतं. भारत पाकिस्तान सामन्यासोबत काही खेळाडूंमध्ये द्वंद्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता खेळाडू वरचढ ठरेल? याबाबतही चर्चा रंगली आहे. असंच काहीसं द्वंद्व विराट कोहली आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात पाहायला मिळणार आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचा विकेटटेकर बॉलर आहे. त्यामुळे विराट कोहलीवर शाहीन आफ्रिदी भारी पडेल, अशी चर्चा रंगली आहे.या दोन्ही खेळाडूंमध्ये कोण सरस ठरेल असा प्रश्न माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याला विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी आपली पसंती विराट कोहली याला दिली.
हरभजन सिंग याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, अहमदाबादमध्ये विराट कोहली आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात सामना होईल. पण कोहलीचा फॉर्म पाहता त्याला बाद करणं सोप नाही. कोहलीने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये सलग दोन अर्धशतकं ठोकली आहे. हा एक जबरदस्त सामना होईल. पण कोहलीचा फॉर्म सध्या चांगला आहे आणि तो ही लढाई आरामात जिंकेल. शाहीन नव्या चेंडूसह फलंदाजाना पायचीत करण्याचा प्रयत्न करतो.
हरभजन सिंग याने पुढे सांगितलं की, शाहीनची गोलंदाजी परिस्थितीवर अवलंबून आहे. तर परिस्थिती अनुकूल नसेल तर तो साधारण गोलंदाज ठरतो. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात फक्त दोन गडी बाद करता आले. जर तुम्ही आशिया कप आणि वर्ल्डकपमधील दोन सामने पाहाल तर शाहीनला हवी तशी छाप सोडता आली नाही. त्यामुळे अनुकूल परिस्थिती असेल तर तो उत्कृष्ट गोलंदाज ठरतो. पण प्रतिकूल परिस्थितीत त्याची गोलंदाजी साधारण असते.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सउद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन/शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.