IND vs PAK : रोहितसेनेने पाकिस्तानचा गाशा गुंडाळला, भारताला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य
India vs Pakistan ICC World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाला 200 धावांच्या आतमध्ये रोखलं आहे. हाय-व्होल्टेज सामन्यामध्ये सर्वच गोलंदाजांनी किलर प्रदर्शन केलं आहे. पाकिस्तान संघासाठी फक्त बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावा केल्या.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत-पाक सामना सुरू असून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंगचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाला 191 धावात गुंडाळलं आहे. पाकिस्तान संघाकडून बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तर भारताच्या पाचही गोलंदाजांनी दोन विकेट्स घेतल्या. भारताला जिंकण्यासाठी 192 धावांचं लक्ष्य आहे. पाकिस्तानचा पराभव करत भारत सलग तिसरा विजय मिळवतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाकिस्तान संघाची बॅटींग
पाकिस्तान संघाने सावध सुरूवात केली होती, सलामीला आलेले अब्दुल्ला शफीक आणि इमाम-उल-हक यांनी सावध खेळ केला. मात्र त्यांना फार काही वेळ खेळपट्टीवर तग धरता आली नाही. मोहम्मद सिराज याने अब्दुल्ला शफीक याला 20 धावा आऊट करत पहिली विकेट घेतली. बाबर आझम मैदानात आल्यावर त्याने आपले पाय घट्ट करायला सुरूवात केली होती.
मोहम्मद सिराज यांच्यानंतर हार्दिक पंड्या याने मंत्र टाकत इमाम याला आऊट करत दुसरी विकेट घेतली. त्यानंतर मैदानात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरायला सुरूवात केली. बाबरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 50 धावांवरच असताना मोहम्मद सिराज याने बोल्ड करत भारताचं सामन्यात कमबॅक केलं.
बाबर आऊट झाल्यावर पाकिस्तान संघाच्या 162 ला 4 विकेटस् होत्या. त्यानंतर अवघ्या २९ धावांमध्ये सहा विकेट्स गेल्या. कुलदीप यादवने सौद शकील, इफ्तिखार अहमद यांना एकाच ओव्हरमध्ये मााघारी पाठवलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहने शादाब खान आणि मोहम्मद रिझवान यांना बोल्ड करत माघारी पाठवलं. शेवटला पंड्याने एक जडेजाने दोन अशा एकूण पाचही गोलंदाजांनी दोन-दोन विकेट्स पाकिस्तानचा डाव 191 धावांवरच गुंडाळला.
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज