IND vs PAK : शाहीद आफ्रिदीच्या एका कॉलनंतर रैनाकडून पोस्ट डिलीट, नेमकं काय घडलं?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा रंग आता चढू लागला आहे. खासकरून भारत पाकिस्तान सामन्याची रंगत आतापासून वाढू लागली आहे. भारत पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही बाजूने वाकयुद्ध सुरु झालं आहे. पण रैनाच्या एका ट्वीटने वाद आणखी पेटला. त्यानंतर शाहीद आफ्रिदीने हस्तक्षेप केला आणि वादावर काही अंशी पडदा पडला.

IND vs PAK : शाहीद आफ्रिदीच्या एका कॉलनंतर रैनाकडून पोस्ट डिलीट, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 7:12 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. या स्पर्धेतील भारत पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता आतापासून लागली आहे. असं असताना भारत पाकिस्तानचे दोन दिग्गज खेळाडू आमनेसामने आले आहेत. सुरेश रैनाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या निवृत्तीवर भाष्य केलं आणि वाद आणखी पेटला. मात्र आता या वादावर काही अंशी पडदा पडला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान समालोचन करताना आकाश चोप्राने सुरेश रैनाला एक प्रश्न विचारला आणि वादाला सुरुवात झाली. आकाश चोप्राने विचारलं की, “निवृत्तीनंतर पदार्पण करून टीम इंडियासाठी खेळणार का?” या प्रश्नावर सुरेश रैनाने शाहीद आफ्रिदीचं उदाहरण देत उत्तर दिलं. “माझं नाव सुरेश रैना आहे. मी शाहीद आफ्रिदी नाही.” रैनाचं हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. त्याच्या या वक्तव्याने पाकिस्तानी क्रीडाप्रेमींना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यानंतर त्यांनी रैनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आयसीसीने शाहीद आफ्रिदीला टी20 वर्ल्डकपसाठी अँबेसेडर म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर पाकिस्तानी पत्रकाराने रैनाला टॅग करत लिहिलं की, “आयसीसीने शाहीद आफ्रिदीला टी20 वर्ल्डकप 2024 साठी अँबेसेडर केलं आहे. हॅलो सुरेश रैना” त्याच्या या ट्वीटवर सुरेश रैनाने तसंच उत्तर दिलं. “मी भले आयसीसी अँबेसेडर नाही. पण माझ्या घरी 2011 वर्ल्डकप आहे. तुम्हाला मोहालीत खेळलेला सामना आठवतो का? मला आशा आहे की, या कटू आठवणीने तुम्हाला त्रास होत असेल.”

Suresh_Raina_Post

भारताने 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरीत पराभूत केलं होतं. या ट्वीटनंतर शाहीद आफ्रिदीने रैनासोबत चर्चा केली. त्यानंतर रैनाने ते ट्वीट डिलीट केलं. आफ्रिदीने यानंतर एक वक्तव्यही केलं आहे. “मी रैनासोबत अनेक चांगले क्षण घालवले आहेत. तो चांगला व्यक्ती आहे. कधी कधी छोटे छोटे वाद होतात. सोशल मीडियावरील त्याची पोस्ट पाहिली आणि त्याच्याशी चर्चा केली. त्याने लहान भावासारखं समजून घेतल आणि ते ट्वीट डिलीट करायला तयार झाला. महान व्यक्ती आपली चूक लगेच दुरूस्त करतात. “

Non Stop LIVE Update
मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार
मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार.
महिलांनो...आता फक्त 'हीच' कागदपत्रं आवश्यक; 'या' तारखेच्या आत करा अर्ज
महिलांनो...आता फक्त 'हीच' कागदपत्रं आवश्यक; 'या' तारखेच्या आत करा अर्ज.
विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार?
विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार?.
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.