IND vs PAK : शोएब अख्तरची भारताच्या वाघांनी जिरवली, टीम इंडिया 119 वर ऑल आऊट झाल्यावर पाहा काय म्हणालेला?
टीम इंडियाने पाकिस्तानला परत एकदा पराभूत करत बाप बाप होता है हे दाखवून दिलं आहे. टीम इंडियाच्या विकेट पडत असताना शोएब अख्तर याल उकळ्या फुटू लागल्या होत्या. मात्र भारताच्या वाघांनी त्याची जिरवून दाखवली.
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना नेहमीप्रमाणे हायव्होल्टेज ठरला. भारतीय संघाने शेवटपर्यंत हार न मानता विजय खेचुन आणला. पहिल्यांदा बॅटींग करताना भारतीय संघ अवघ्या 119 धावांवर गुंडाळला गेल होता. त्यामुळे पाकिस्तान या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करणार वाटत होतं. असाता आत्मविश्वास पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यालाही होता. शोएब याने भारताच्या विकेट पडत असताना ट्विट करत टीम इंडियाची चेष्टा केलेली. मात्र हार मानतील ते भारतीय कसले, भारताच्या वाघांनी शोएब अख्तरचा जिरवली.
काय म्हणालेला शोएब अख्तर?
टीम इंडियाची बॅटींग ढेपाळली, विराट कोहली, रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या स्वस्तात परतले होते. एकट्या ऋषभ पंत याने पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर तळ ठोकत 42 धावांची जिगरबाज खेळी केली होती. टीम इंडियाला संपूर्ण 20 ओव्हर्सही खेळता आलं नाही. टीम इंडियाच्या विकेट पडत असताना पाकिस्तानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी पाकिस्तानचा माजी खेळाडू आणी रावळपिंड एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तर यानेही, हाँजी, काय म्हणताय, भारताची किती टोटल होईल? असं म्हटलं होतं.
शोएब अख्तर याने ट्टिट केल्यावर पाकिस्तानच्या समर्थकांनीही मजा घेतली. मात्र खरी मजा तेव्हा आली जेव्हा टीम इंडियाने संपूर्ण सामन आपल्या बाजूने झुकवला. भारताचे वेगवान गोलंदाज पाकिस्तान संघावर अक्षरक्ष: तुटून पडले होते. एकही धाव घेण्यासाठी पाकिस्तानची बेजारी केली होती. जसप्रीत बुमराहने हुकमी एक्का का बोललं जात हे परत एकदा सिद्ध करून दाखवलं.
Haanji. Kya kehtay hain? Total kitna hoga India ka?
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 9, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग