INDIA vs PAKISTAN | पाकिस्तान विरुद्ध दमदार विजय, त्यानंतरही रोहित असं काय म्हणाला?
Rohit Sharma Reaction After Win Against Pakistan | टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवून 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मात्र या विजयानंतर रोहित असं नक्की काय म्हणाला? जाणून घ्या.
अहमदाबाद | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने यासह विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने याआधी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला चितपट केलं. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर रोखलं. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या पाच जणांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान 30.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 86 आणि श्रेयसने नाबाद 53 धावा केल्या. रोहित शर्मा याने विजयानंतर प्रतिक्रिया दिली. तो काय म्हणाला जाणून घेऊयात.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“गोलंदाजांनी आमच्या विजयाचा पाया रचला. पाकिस्तानला 190 धावांवर ऑलआऊट करणं मोठी बाब आहे. या खेळपट्टीवर 190 तर एक वेळ 280-290 धावा होतील, असं वाटत होतं . मात्र आमचे 6 गोलंदाज हे सामना जिंकून देवण्याची क्षमता ठेवतात”, अशा शब्दा रोहितने विजयाचं श्रेय हे गोलंदाजांना दिलं आणि त्यांचं कौतुक केलं. रोहितने पाकिस्तान विरुद्ध 84 धावांची विधंवस्क खेळी केली. मात्र 14 धावांनी त्याचं शतक हुकलं. रोहितने यावर प्रतिक्रिया दिली.
“प्रत्येक दिवस हा तुमचा नसतो. मात्र कर्णधार म्हणून तुमची भूमिका निर्णायक ठरते. टीममध्ये प्रत्येकाला आपलं योगदान आणि भूमिका काय आहे हे माहितीय आणि ही चांगली बाब आहे”, असंही रोहितने नमूद केलं. तसेच रोहितने भूतकाळात काय झालं त्याबाबत टाळलं.
“वर्ल्ड कपमध्ये खेळण्याआधी आम्ही भूतकाळाबाबत विचार करु इच्छित नाही. काय करायचंय ते आम्हाला माहितीय. फलंदाजांना बॅटिंगची संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचा फायदा मिळाला. तसेच गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख पार पाडली आणि न्याय दिला.”, असं रोहितने सांगितलं.
“आम्ही या विजयामुळे फार उत्साहित होऊ इच्छित नाही. ही मोठी स्पर्धा आहे. नऊ साखळी सामने, सेमी फायनल आणि फायनल. आम्हाला संतुलन बनवून ठेवावं लागेल. सातत्य कायम राखावं लागेल. कोणतीही टीम कुणालाही पराभूत करु शकते. आम्हाला सामन्याच्या दिवशी चांगलं खेळायचं आहे. काय घडलं आणि काय घडणार हे फार महत्त्वाचं नाही”, असंही रोहितने ठामपणे सांगितलं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.