IND vs PAK : पाकिस्तानचा तो खेळाडू मैदानात हमसून हमसून रडला? पाहा व्हायरल व्हिडीओ
काल आशिया चषकात भारताला मोठं यश मिळालं. तर पाकिस्तानचा पराभव झाला. जेव्हा संघाचा पराभव होतो, तेव्हा खेळाडूंची निराशा होते. असाच काहीसा प्रकार काल पहायला मिळाला. वाचा सविस्तर...
नवी दिल्ली : क्रिकेट (Cricket) असो वा कोणताही इतर खेळ. खेळात यश- अपयश येणारच. अपयश आल्यास निराश न होता. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळींकडून दिला जातो. कारण, खेळात सराव हा महत्वाचा आहे. पराजीत झाल्यास पुन्हा तुम्हाला विजय मिळवण्यासाठी रडून किंवा निराश होऊन चालत नाही. त्यासाठी तितक्याच मेहनतीनं आणि जिद्दीनं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. असंच काहीसं आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात काल पहायला मिळालं. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या (IND vs PAK) सामन्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू हमसून हमसून रडताना दिसून आला. आता हा खेळाडू नेमका का रडला, या व्हिडीओत नेमकं काय आहे, याविषयी काल चांगलीच चर्चा रंगली. हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नसीम शाहला रडू आलं
काल आशिया चषकात भारताला मोठं यश मिळालं तर पाकिस्तानचा पराभव झाला. अशा परिस्थितीत जेव्हा संघाचा पराभव होतो, तेव्हा खेळाडूंची निराशा होते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहसोबत पाहायला मिळाला . मैदानातून बाहेर पडताना तो रडताना दिसला. गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट त्यांना समजावून सांगत होते.
नसीमकडून पहिल्याच षटकात भारताला धक्का
नसीमने पहिल्याच षटकात भारताला धक्का दिला. त्याने केएल राहुलला बाद केले. नसीमच्या चेंडूवर विराट कोहलीलाही जीवदान मिळाले कारण त्याचा झेल स्लिपमध्ये सोडला गेला. नसीमनं पुन्हा डावातील 18 वे षटक टाकले, ज्यामध्ये त्याच्या पायाला त्रास झाला. त्याला गोलंदाजी करणे कठीण जात होते. दुसऱ्या चेंडूवर त्याला ही समस्या आली पण तरीही त्याने गोलंदाजी सुरूच ठेवली. चौथा चेंडू टाकल्यानंतर तो वेदनेने ओरडू लागला आणि अशा स्थितीत फिजिओला बोलवावे लागले. नसीमला मात्र त्याचे ओव्हर पूर्ण करण्यात यश आले. त्याने चार षटकांत 27 धावा देत दोन बळी घेतले. राहुलशिवाय त्याने सूर्यकुमार यादवला आपला बळी बनवले.
पंड्या-जडेजामुळे विजय
नसीमचे हे षटक महागडे ठरले. जडेजाने या षटकात एकूण 11 धावा दिल्या आणि येथून सामना भारताकडे वळला . यानंतर पंड्या आणि जडेजाने भारताला विजयाच्या जवळ नेले. हरिस रौफच्या पुढच्या षटकात हार्दिकने तीन चौकार मारले. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी सात धावांची गरज होती. मोहम्मद नवाजने टाकलेल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर जडेजा बाद झाला. पण त्यानंतर पंड्याने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.पांड्या 33 धावांवर नाबाद राहिला. त्याने तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या.