IND vs PAK | 10 डिसेंबरला टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, जाणून घ्या
India vs Pakistan | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघ 10 डिसेंबरला भिडणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे होणार जाणून घ्या.
दुबई | आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. अंडर 19 आशिया कप स्पर्धेला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी असणार आहेत. मात्र या स्पर्धेपेक्षा सर्वाधिक लक्ष हे टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याकडे लागून राहिलं आहे. या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघातील महामुकाबला केव्हा होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
एक ट्रॉफी आणि 8 टीम
अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे 8 ते 17 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार तिथपासून अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात. या स्पर्धेतील 8 संघांना 2 ग्रुपमध्ये 4-4 असं विभागण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. सामन्याचं आयोजन हे आयसीसी अकादमीच्या ग्राउंड नंबर 2 वर करण्यात आलं आहे. अंडर 19 आशिया कपमधील सर्व सामन्यांना सकाळी 11 वाजता सुरुवात होईल.
लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदने केलं आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर प्रसारित केले जाणार नाहीत. मात्र एसीसीच्या यु्ट्युब चॅनेलवर हे सामने पाहता येतील.
अंडर 19 आशिया कपसाठी टीम इंडिया | उदय सहारन (कॅप्टन), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर) धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.
पाकिस्तान टीम | साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), अराफात मिन्हास (उपकर्णधार), अहमद हुसैन, अली असफंद, अमीर हसन, अजान अवैस, खुबैब खलील, नजाब खान, नवीद अहमद खान, मोहम्मद रियाजुल्लाह, मोहम्मद तैयब आरिफ, मोहम्मद जीशान, शाहजेब खान, शमील हुसैन आणि उबैद शाह.