IND vs PAK : भारतीय संघाने पाकिस्तानच्या दोन कमजोरींचा फायदा घेतला तर विजय निश्चित, कोणत्या त्या जाणून घ्या!
World Cup 2023 IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक दोन संघ भिडणार आहेत. अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्याआधी पाकिस्तान संघाच्या दोन मोठ्या कमजोरी समोर आल्या आहेत. याचाच फायदा घेत भारतीय संघाला विजयाची हॅट्रीक करण्याची नामी संधी आहे.
मुंबई : क्रिकेटमधील हाय-व्हेल्टेज सामना (World Cup 2023 IND vs PAK) सुरू व्हायला अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. वर्ल्ड कपमधील या महामुकाबल्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष असतं. भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहता वन डे वर्ल्ड कपमध्ये वर्चस्व राखलं असून आजच्या सामन्यातही पाकिस्तान संघाने दोन चूका त्यांनी केल्या तर सामना गमावण्याची वेळ येऊ शकते. नेमक्या त्या दोन चुका कोण आहेत जाणून घ्या.
पाकिस्तान संघाच्या दोन मोठ्या कमजोरी
पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप इतिहासामधील सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी ही कामगिरी केली. मात्र पाकिस्तान संघाच्या दोन मोठ्या कमजोऱ्या समोर आल्या. यामधील एक पाटा पिचवर गोलंदाजांची चांगलीच धुलाई झालेली पाहायला मिळाली. श्रीलंके संघाने 344 धावा केल्या होत्या. कुसल मेंडिस याची शतकी खेळी आणि श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी पाकच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडलेला. मात्र मोठे फटके मारण्याच्या नादात विकेट गमावल्या नाहीतर लंकेच्या ३०-४० धावा कमी पडल्या.
पाकिस्तानच्या स्ट्राईक गोलंदाजांची चांगलीच खरडपट्टी काढलेली पाहायला मिळाली होती. शाहीन शाह आफ्रिदी 9 ओव्हर- 66 धावा, हसन अली 10ओव्हर – 71 धावा, मोहम्मद नवाज – 9 ओव्हर – 62 धावा, हॅरिस रॉफ 10 ओव्हर– 64 धावा, शादाब खान 8 ओव्हर– 55 धावा मोजल्या होत्या. भारताची फलंदाजी पाहिली तर रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, हार्दिक पंड्यासारखे खंदे फलंदाज आहेत. त्यामुळे पाकच्या गोलंदाजांनी सुधारणा नाही केली तर आजसुद्धा त्यांना चांगला चोप पडू शकतो.
पाकिस्तान संघाची कमजोरी संपूर्ण जगाने पाहिली ती म्हणजे त्यांची कमकुवत फिल्डिंग. रोहित शर्मासारखा खेळाडू तुफान फॉर्ममध्ये असताना पाकिस्तान संघाची एक चूक त्यांना भारी पडू शकते. श्रीलंकेचा शतकवीर कुसल मेंडिस याला मिळालेले दोन जीवदान चांगलेच भारी पडले. आजच्या सामन्यामध्ये ही सुधारणा नाही केली तर बाबर सेनेचा पराभव निश्चित आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.