IND vs PAK, WWC 2022 LIVE Streaming: भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

न्यूझीलंडमध्ये (New Zealand) महिला वर्ल्डकप स्पर्धा (ICC Women’s World Cup) सुरु झाली आहे. या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना उद्या (रविवारी) खेळवला जाईल. सुपर संडेमध्ये भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमने-सामने असतील.

IND vs PAK, WWC 2022 LIVE Streaming: भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
IND W vs PAK W
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 7:36 PM

नवी दिल्ली : न्यूझीलंडमध्ये (New Zealand) महिला वर्ल्डकप स्पर्धा (ICC Women’s World Cup) सुरु झाली आहे. या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना उद्या (रविवारी) खेळवला जाईल. सुपर संडेमध्ये भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमने-सामने असतील. दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत उत्कंठावर्धक होण्याची अपेक्षा आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा पैसा वसूल सामना असेल. क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना युद्धापेक्षा कमी नसतो. या सामन्याच्या माध्यमातून भारत-पाकिस्तानच्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. विजय मिळवण्याचाच दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ यासाठी जोरदार प्रयत्न करतील, यात कुठलीही शंका नाही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी सर्व खेळाडू फिट आहेत, ही भारतीय महिला संघासाठी चांगली बाब आहे. हरमनप्रीत कौरचं फॉर्ममध्ये येणं, हे भारतासाठी फायद्याचं आहे. ती चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकते. याच क्रमांकावर फलंदाजीला येणं, तिला आवडतं. याच क्रमांकावर खेळताना तिने वॉर्मअप मॅचमध्ये (सराव सामन्यात) शतक ठोकलं होतं. पाकिस्तान विरुद्ध तोच फॉर्म कायम ठेवण्याची तिच्याकडून अपेक्षा असेल.

महिला विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान कधी आमनेसामने येतील?

भारत आणि पाकिस्तानचे संघ 06 मार्चला (रविवार) आमनेसामने येतील.

महिला विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

महिला विश्वचषक 2022 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बे ओव्हल मँगुई येथे खेळवला जाईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला विश्वचषक 2022 मधला सामना किती वाजता सुरू होईल?

महिला विश्वचषक 2022 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक सकाळी 6 वाजता होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह डिस्ने+हॉटस्टारवर (Disney+Hotstar) ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

IND vs SL: रोहितने विराटला मैदानात दिला असा खास सन्मान, जे बोलला ते करुन दाखवलं, पहा VIDEO

IND vs SL 1st Test: रवींद्र जाडेजला डबल सेंच्युरीपासून का रोखलं? राहुल द्रविड जबरदस्त ट्रोल, पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल

IND vs PAK, Women’s World Cup 2022: भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला, विजयासाठी होणार भीषण संग्राम

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.