टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20i मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील पहिला सामना हा डरबन येथे होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. सूर्याच्या नेतृत्वातील भारताचा हा दुसरा दक्षिण आफ्रिका दौरा आहे. भारताने याआधी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तेव्हा 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. तर 1 सामना हा पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे यंदा टीम इंडियाचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहेत. मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघे टीम इंडियासाठी ओपनिंग करण्याची शक्यता आहे. अभिषेक टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर ओपनिंग करतोय. तर संजूने बांगलादेशविरुद्ध ओपनिंग केली होती. अशात हे दोघे पुन्हा ओपनिंग करण्यासाठी तयार आहेत. कॅप्टन सूर्यकुमार यादव तिसर्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. तिलक वर्माला चौथ्या स्थानी पाठवलं जाऊ शकतं. ऑलराउंडर हार्दिक पंड्या पाचव्या स्थानी येऊन शकतो. रिंकून सिंह आणि अक्षर पटेल या दोघांवर फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी असेल.
वरुण चक्रवर्ती अक्षर पटेल याच्यासह दुसरा स्पिनर म्हणून जबाबदारी बजावताना दिसू शकतो. तर अर्शदीप सिंह, यश दयाल आणि आवेश खान या तिघांवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असू शकते.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.