रोहित शर्मानं इतिहास रचला, धोनी-विराटलाही मागे टाकलं
रोहितनं पुन्हा एक रेकॉर्ड करून धोनीलाही मागे टाकलंय.
नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA 2nd t20) सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेनं (South Africa) नाणेफेक जिंकली असून भारताला (Team India) पहिले फलंदाजी दिली. यावेळी कर्णधार रोहित शर्मानं इतिहास रचलाय. यावेळी त्यानं पुन्हा एक मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे सगळीकडे रोहितची चर्चा सुरु आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं आज क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक नवा विक्रम केला. 400 T20 सामने खेळणारा तो पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू ठरलाय.
हे ट्विट पाहा
Most T20 Matches
614 – Pollard 556 – DJ Bravo 481 – Malik 463 – Gayle 435 – Narine 429 – Bopara 428 – Russell 403 – Miller 400 – Rohit*
Rohit Sharma becomes 9th player to played 400th T20 Match#RohitSharma#INDvSA
— Trendy Cricket (@Trendy_Cricket) October 2, 2022
आज गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी नाणेफेकसाठी बाहेर पडताना रोहितनं ही कामगिरी केली.
हे विक्रमची वाचा….
जगात सर्वाधिक T20 सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा अखेळाडू केरॉन पोलार्डच्या नावावर आहे. यानं आतापर्यंत 614 सामने खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ ड्वेन ब्राव्हो (556), शोएब मलिक (481), ख्रिस गेल (463), सुनील नरेन (435), रवी बोप्रा (429), आंद्रे रसेल (428) आणि डेव्हिड मिलर (402) यांचा क्रमांक लागतो.
पुरुष क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सलामीवीर रोहितच्या नावावर आहे. रोहितनं आतापर्यंत 140 T20I सामने खेळले आहेत. हे पाकिस्तानच्या शोएब मलिकपेक्षा 16 जास्त आहेत.
रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि एमएस धोनी हे एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहेत. यांनी T20I मध्ये 350 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. रोहित 2007 च्या विश्वचषकापासून टी-20 सामने खेळत आहे.