IND vs SA 2nd t20 : टीम इंडियाचा विजय, दक्षिण आफ्रिका 16 धावांनी पराभूत

IND vs SA 2nd t20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात टीम इंडियानं मोठी कामगिरी केलीय.

IND vs SA 2nd t20 : टीम इंडियाचा विजय, दक्षिण आफ्रिका 16 धावांनी पराभूत
Team IndiaImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 11:21 PM

नवी दिल्ली :  गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात भारतानं (Team India) विजय मिळवला आहे. पहिले फलंदाजी करताना भारतानं तीन बाद 237 धावा केल्या होत्या. पण, दक्षिण आफ्रिकेला हे टार्गेट पूर्ण करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय.

टीम इंडियाचा विजय

सर्वोच्च धावसंख्या

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. टी-20 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

सूर्यकुमार जोमात

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सूर्यकुमार सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उजव्या हाताच्या फलंदाजाने अनेक विक्रम केले.

बीसीसीआयचं ट्विट

विराटच्या 11 हजार धावा

कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवा विक्रम केला आहे. कोहलीनं T20 मध्ये आपल्या 11,000 धावा पूर्ण केल्या आहेत आणि तो या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

बीसीसीआयचं ट्विट

रोहितचा नवा विक्रम

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं आज क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक नवा विक्रम केला. 400 T20 सामने खेळणारा तो पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू ठरलाय.

राहुलचं अर्धशतक

11व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर राहुलनं अर्धशतक पूर्ण केलं. मार्करामच्या चेंडूवर षटकार ठोकत राहुलनं आपलं अर्धशतक पूर्ण केलंय.

डेकॉकचं अर्धशतक

डी कॉकनं 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर धाव घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. यासाठी त्यानं 39 चेंडूंचा सामना केला.

आयसीसीचं ट्विट

मिलरचं अर्धशतक

डेव्हिड मिलरनं 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. अर्शदीप सिंगनं ऑफ-स्टंपच्या बाहेर फुल लेन्थ बॉल टाकला. त्यावर मिलरनं दमदार षटकार मारला. पुढच्याच चेंडूवर मिलरने एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केलंय.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.