हार्दिक पांड्याचं अर्शदीपसोबत मैदानातील वागणं नेटकऱ्यांना खुपलं, सरळ आशा भाषेत सुनावलं
दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या टी20 सामन्यात 3 गडी आणि 6 चेंडू राखून पराभूत केलं. या पराभवाची वेगवेगळी कारणं आहेत. पण सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर हार्दिक पांड्या आला आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. नेमकं काय झालं ते समजून घेऊयात.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी20 सामना गमावल्यानंतर हार्दिक पांड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध डेथ ओव्हरमध्ये त्याचं वागणं नेटकऱ्यांना खटकलं आहे. एक तर रुबाबात अर्शदीपला नॉन स्ट्राईकला उभं केलं. पण स्वत: मात्र स्ट्राईकला राहून काही केलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याची सोशल मीडियावर शाळा घेतली आहे. खरं तर भारताची धावसंख्या आणि विकेट पाहता 19 आणि 20 व्या षटकात मोठी धावसंख्या अपेक्षित होती. 19 वं षटक टाकत असलेल्या गेराल्ड कोएत्झीच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीप सिंग धाव घेऊ शकला नाही. त्यामुळे नॉन स्ट्राईकला असलेला हार्दिक पांड्या अस्वस्थ होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली आणि हार्दिकला स्ट्राईक दिली. मग काय हार्दिकच्या अहंकाराचा फुगा फुटला असं नेटकरी म्हणत आहेत. तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर एक वाइड आला. त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक स्वत:जवळ ठेवला. त्यामुळे 19व्या षटकात फक्त 3 धावा आल्या.
अर्शदीप सिंगने 19व्या षटकात हार्दिक पांड्याला स्ट्राईक देताच हार्दिक पांड्याने अर्शदीपला काय सांगितलं ते स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. हार्दिक पांड्याने सांगितलं की, आता तेथूनच मजा घे. त्याने आपल्या शैलीतून आक्रमक खेळी करणार हे सांगितलं होतं. 20 व्या षटकात हार्दिक पांड्याने स्ट्राईक स्वत:जवळ ठेवली होती. पण पहिले चार चेंडू निर्धाव गेले. यात हार्दिक पांड्याचे दोन झेल सुटले. पाचव्या चेंडूवर 2 आणि सहाव्या चेंडूवर चौकार आला. असं करत दोन षटकात फक्त 9 धावा आल्या. यामुळे भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजय 124 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 19व्या षटकात पूर्ण केलं.
Hardik to Arshdeep in 18.2 over in front of mic, “Now enjoy from the other END”🤣,” after that Arshdeep gave a single, he went on to score 6 from 10 balls!🤦#SAvIND #HardikPandya pic.twitter.com/MmAJhBfqfi
— ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) November 10, 2024
Hardik after saying “Enjoy from other end” to Arshdeep.
0, 0, 0, 1B, 0, 0, 0, 0, 2, 4 pic.twitter.com/8k0lHEFN4x
— Sᴜᴊɪ (@Im_Suji) November 10, 2024
9 runs in the last 2 overs and Hardik wasn’t giving strike to Arshdeep when he literally managed to connect bat and ball like couples of overs ago. Horrible
— EL_DORADO_07 (@137off120_) November 10, 2024
Arshdeep watching Hardik waste full over after Hardik asked him for strike and said loudly ‘enjoy now’ pic.twitter.com/MLy4mcx4ft
— Zafar Supari (@aalooponga) November 10, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर