IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतासाठी करो मरोची लढाई, जर असं झालं तर…

भारत आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढचा सामना खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकावाच लागणार आहे. पण पावसाने हजेरी लावली तर मालिका हातून गेलीच समजा.

IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतासाठी करो मरोची लढाई, जर असं झालं तर...
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 10:09 PM

दक्षिण अफ्रिकन महिला संघ भारत दौऱ्यावर असून शेवटचा टी20 सामना शिल्लक आहे. भारताने वनडे मालिकेत दक्षिण अफ्रिकेला 3-0 ने मात दिली. त्यानंतर एकमेव कसोटी सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. मात्र टी20 क्रिकेटमध्ये दक्षिण अफ्रिकेने भारताला बॅकफूटवर ढकललं. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण अफ्रिकेने 12 धावांनी जिंकला. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताला 177 धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पावसामुळे भारताचा डाव होऊ शकला नाही. आता या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना मंगळवारी होत आहे. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाकडे एक संधी आहे. हा सामना गमवला किंवा पावसामुळे रद्द झाला तर ही मालिका दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात पडेल. कारण दक्षिण अफ्रिकेने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना व्हावा अशीच भारतीय क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे.

तिसऱ्या टी20 सामन्यावरही पावसाचं सावट आहे. कारण मंगळवारी 30 ते 40 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसामुळे या सामन्यात वारंवार व्यत्यय येऊ शकतो. या मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिने चेन्नईच्या जनतेचे आभार मानले आहेत.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका महिला संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेके बॉश, ॲनेरी डेर्कसेन, एलिझ-मारी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, मिके डी रीडर , तुमी सेखुखुणे , मसाबता क्लास , सून लूस

भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा चेत्री (विकेटकीपर), एस सजाना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, दयालन हेमलता, रेणुका ठाकूर सिंग, रिचा घोष, अमनजोत कौर, शबनम मो. शकील, आशा शोभना

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.