Team India | विराट-रोहितचं व्हाईट बॉल करिअर संपलं! टी 20 वर्ल्ड कपबाबत अनिश्चितता
Rohit Sharma And Virat Kohli | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काहीच दिवसात टी 20 मालिका होणार आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार आहे.
मुंबई | टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ या दौऱ्यात अनुक्रमे टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकेसाठी बीसीसीआयने 3 कर्णधारांची नेमणूक केली आहे. रोहितने वनडेमधून विश्रांती घेतल्याने केएल राहुल याला सूत्र देण्यात आली आहेत. हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव टी 20 मालिकेत कारभार पाहणार आहे. तर कसोटी मालिकेत रोहित शर्मा हाच कॅप्टन असणार आहे.
आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं टी 20 टीममध्ये कमबॅक होईल, अशी दाट शक्यता होती. इतकंच नाही, तर रोहितची टी 20 कॅप्टन्सीसाठी मनधरणी करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र झालं उलटच. या दोघांची टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही, अर्थात या दोघांनी तशी विनंतीच निवड समितीला केली होती. मात्र टी 20 वर्ल्ड कप पाहता हे दोघे टीममध्ये असावे, अशी चाहत्यांची इच्छा आणि काळाची गरज आहे. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे रोहित आणि विराट या दोघांची टी 20 कारकीर्द संपली का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिका दौरा आणि टीम इंडिया
टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 10 डिसेंबरपासून टी 20 सीरिजने सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढे एकदिवसीय मालिका आणि टेस्ट सीरिज होणार आहे. टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये प्रत्येकी 3 सामने होणार आहेत. तर टेस्ट सीरिजमध्ये 2 मॅच होणार आहेत.
साई सुदर्शन याची पहिल्यांदाच निवड
दरम्यान दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी साई सुदर्शन या युवा खेळाडूची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.