IND vs SA | टेस्टमधून निवृत्त होणारा ‘हा’ खेळाडू टीम इंडियाला पुरून उरला, शतकवीर अजूनही नाबाद कोण आहे?

dean elgar hundread : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये एक स्टार खेळाडू पुरून उरला आहे. टीम इंडियाविरूद्ध शतक करत अजुनही तो मैदानावर आहे.

IND vs SA | टेस्टमधून निवृत्त होणारा 'हा' खेळाडू टीम इंडियाला पुरून उरला, शतकवीर अजूनही नाबाद कोण आहे?
IND vs SA 1st test Live Streaming
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 10:24 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी मालिकांमधील पहिला कसोटी सामना सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याचा आजचा दुसरा दिवस होता, आतापर्यंत साऊथ आफ्रिका संघाने पकड मिळवली आहे. आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर याने नाबाद शतकी खेळी करत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं आहे. डीन एल्गर याने टीम इंडियाविरूद्ध शतक ठोकत मोठे पराक्रम आपल्या नावावर केले आहेत.

टीम इंडियाविरूद्ध शतकी खेळी करणाऱ्या एल्गरने आफ्रिका संघाकडून ओपनर म्हणून 5000 धावा केल्या आहेत. पाच हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा तो चौखा खेळाडू बनला आहेय. या यादीमध्ये ग्रॅमी स्मिथ (9,018), गॅरी कर्स्टन (5,726) आणि हर्शल गिब्स (5,242) तिसऱ्या स्थानी आहेत. कसोटी क्रिकेटमधील एल्गरने वैयक्तिक 14 वं शतक झळकवलं आहे. साऊथ आफ्रिकेमधील सात मैदानांवर सामने खेळले आहेत यामधील सातच्या सात मैदानांवर त्याने शतक ठोकलं आहे. सेंच्युरियन मैदानावरील त्याचं हे पहिलं शतक आहे. आफ्रिकेत खेळताना सर्व ठिकाणी शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

डीन एल्गर याने कसोटी मालिकेआधीच आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आतापर्यंत एल्गर याने 84 कसोटी सामन्यांमध्ये 5146 धावा केल्या आहेत. यामध्ये 199 सर्वात बेस्ट स्कोर होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: घाम फोडला. अजुनगी एल्गर 140 धावांसह खेळत आहे. एल्गरने या सामन्यात सुरूवातीपासूनच एकाही गोलंदाजाला लाईन पकडू दिली नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना सुरूवातीला डिफेन्स करून खेळला त्यानंतर एकदा सेट झाल्यावर गड्याने मैदानात आपले घट्ट पाय रोवले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....