IND vs SA Final : अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेत्याची घोषणा कशी केली जाणार? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये होणाऱ्या सामन्यात पावसाचं सावट आहे. वेदर डॉक कॉमनुसार 29 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 70 टक्के पावसाची शक्यता आहे. जर सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर विजेता कोण ते जाणून घ्या.

IND vs SA Final : अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेत्याची घोषणा कशी केली जाणार? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 7:33 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. 29 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. तर दक्षिण अफ्रिकेने टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं दाट सावट आहे. अंतिम सामन्यात पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. Weather.com नुसार, 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्यात वारंवार खंड पडण्याची शक्यता आहे.आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. 29 जूनचा सामना पावसामुळे रद्द झाला तर हा सामना 30 जूनला खेळवला जाईल. तसेच अंतिम सामन्यासाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे.

पावसामुळे सामना झालाच नाही तर विजेत्या कोणाला घोषित केलं जाईल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर सुपर 8 फेरीत टॉप असलेल्या संघाला पुढची संधी दिली जाणार होती. पण तसं काही झालं नाही. दोन्ही उपांत्य फेरीचे व्यवस्थितरित्या पार पडले. भारत इंग्लंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आला पण सामना पूर्ण झाला. अंतिम फेरीसाठी असा काही वेगळा नियम नाही. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण अफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार) , ओटनील बार्टमन , गेराल्ड कोएत्झी , क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , ब्योर्न फॉर्च्युइन , रीझा हेंड्रिक्स , मार्को जॅन्सेन , हेनरिक क्लासेन , केशव महाराज , डेव्हिड मिलर , ॲनरिक नॉर्टजे , कागिसो रबाडा , सेंट ट्रायब्स्स्टन , ट्रायब्स्स्टन , रियान टॅब्सी.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , ऋषभ पंत , संजू सॅमसन , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , कुलदीप यादव , युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.