IND vs SA | मानलं भावा, अखेर आफ्रिकेविरूद्धच्या कसोटीत ‘या’ जिगरबाज खेळाडूची निवड
SA vs IND : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेआधी ऋतुराज गायकवाड हा बाहेर झाला असून त्याच्या जागी एका जिगरबाज खेळाडूची निवड झाली आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील होणाऱ्या कसोटी मालिकेआधी स्टार खेळाडूला धक्का बसला आहे. मराठमोठा खेळाडू ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. ऋतुराजला दुखापत झाल्याने तो कसोटी मालिकेत खेळणार नाही. वन डे मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. ऋतुराज गायकवाड याच्या जागी युवा खेळडूली संधी मिळाली आहे. बीसीसीआयने या युवा खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे.
कोण आहे हा खेळाडू?
ऋतुराज गायकवाड याच्या जागी ज्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे तो अभिमन्यू ईश्वरन आहे. ईश्वरन सध्या भारत अ संघाचा भाग असून तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तो सलामीवीर म्हणून टीम इंडियात स्थान मिळवू शकतो पण त्याला राखीव खेळाडू म्हणून संघात राहिल.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये ईश्वरन याने दमदार कामगिरी केली आहे. लिस्ट ए सामन्यात त्याने 88 सामन्यांमध्ये 9 शतकांच्या मदतीने 3847 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 149 धावा आहे. टी20 फॉरमॅटमध्ये त्याने 34 सामन्यांमध्ये 976 धावा केल्या आहेत आणि एक शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत यामध्ये त्याची नाबाद 107 ही सर्वोत्तम खेळी आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे. तो केपटाऊनमध्ये खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डीन एल्गरच्या कारकिर्दीतील हा शेवटचा कसोटी सामना असणार असून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), अभिमन्यू ईश्वरन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, (VC), प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).